सनी लिओनीवर चोरीचा आरोप; वाद वाढताच तिने....

सनीला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला.   

Updated: Oct 31, 2019, 07:48 AM IST
सनी लिओनीवर चोरीचा आरोप; वाद वाढताच तिने....  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कोणा एका समाजोपयोगी कामाच्या निमित्ताने अभिनेत्री सनी लिओनी हिने एक चित्र काढत त्या चित्राच्या लिलावातून येणारी रक्कम रुग्णांसाठी दान केली. पण, तिच्या या कृतीसाठी काढण्यात आलेलं चित्र पाहता तिच्यावर एका कलाकृतीची नक्कल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे सनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागला. 

फ्रेंच चित्रकार मलिका फाव्रेच्या कुंचल्याचून सनीने नक्कल केलेल्या चित्राचं मुळ रुप साकारण्यात आलं होतं. याविषयीची वाच्यता सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. 'डाएट सब्या' नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सनीने काढलेलं चित्र आणि फाव्रे यांचं चित्र अशा दोन्ही कलाकृचींचा कोलाज करत त्यामध्ये किती साम्य होतं हे अधोरेखित करण्यात आलं. 

 
 
 
 

A post shared by Diet Sabya (@dietsabya) on

'आम्ही सगळेच समाजोपयोगी कामांचं, समाजसेवेचं समर्थन करतो. पण, एखाद्या कलाकाराच्या कलाकृतीचा श्रेय न देता त्या कलाकृतीची चोरी करणं आणि सामाजिक कार्याच्या नावाखाली त्याच कलाकृतीचा लिलाव करणं हे खेदजनक आहे', असं कॅप्शन  या पोस्टला देण्यात आलं. ही पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून गेली. ज्यानंतर सनीने थेट याचं उत्तर देत आपण कोणाच्याही आणि कोणत्याही कलाकृतीची चोरी केली नसल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला एक चित्र देण्यात आलं होतं, जे पाहूनच आपण ही कलाकृती तयार केल्याचं तिने सांगितलं. सनीच्या या स्पष्टीकरणानंतर परिस्थिती सर्वांसमोर आली. 

सोशल मीडियावर श्रेयवादाच्या मुद्द्यावरुन सुरु असणाऱ्या या वादाला सनी लिओनीने तिच्या परिने हाताळत पूर्णविराम देण्याचा प्रयत्नही केला. पण, काही अंशी हा वाद वेगळंच वळण घेत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आपण हे फक्त आणि फक्त समाजकार्यासाठीच केल्याचं म्हणत हा सर्व निधी कर्करोग ग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात येणार असल्याच्या भूमिकेवरच सनी ठाम होती.