Pooja Dadlani : स्वत:च्या कुटुंबालाही बाजूला सारत 'तिची' शाहरुखला साथ

आर्यन खान प्रकरणात शाहरूखसोबत पूजा खंबीर उभी 

Updated: Oct 29, 2021, 12:55 PM IST
Pooja Dadlani : स्वत:च्या कुटुंबालाही बाजूला सारत 'तिची' शाहरुखला साथ title=

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 3 ऑक्टोबर 2021 रोजी ताब्यात घेतले होते. रेव्ह पार्टी सुरू होती त्या जहाजावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. आर्यनला अटक झाल्यापासून शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी जी सुनावणीदरम्यान न्यायालयात आणि कायदेशीर कारवाईसाठी एनसीबीच्या कार्यालयात दिसते. आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजाच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. 

पूजा ददलानी शाहरुख खानच्या कुटुंबाच्या अगदी जवळ आहे. शाहरूखची पत्नी गौरी खान आणि त्याची मुले, सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान यांच्याशी पूजाचं एक खास नातं आहे. आर्यन आणि सुहानाच्या वाढदिवशी हृदयस्पर्शी नोट्स लिहिण्यापासून ते शाहरुखच्या कुटुंबासोबत प्रत्येक खास प्रसंग साजरे करण्यापर्यंत, पूजा खान कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे.

पूजा ददलानीचे कुटूंब 

2 नोव्हेंबर 1983 रोजी पूजा ददलानीचा जन्म मुंबईत झाला. े मनू ददलानी आणि मीनू ददलानी हे तिचे आई-वडिल. सेलिब्रिटी मॅनेजरने तिचे शिक्षण मुंबईतील Bai Avabai Framji Petit Girls' High School  आणि एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पूर्ण केले होते. पूजाने मास कम्युनिकेशनमध्ये बॅचलर डिग्री देखील घेतली आहे. तिला एक बहीण आहे, गीतिका ददलानी ही अगदी तिच्यासारखीच दिसते. 

पूजा ददलानी नवरा, लग्न आणि मुलगी 

पूजा ददलानी हिने 2008 मध्ये हितेश गुरनानी, जो लिस्टा ज्वेल्सचा दिग्दर्शक आहे त्यासोबत लग्न केले. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेले असतात की सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात. 

पूजा ददलानी शाहरूखच्या कामाची संपूर्ण जबाबदारी सांभाळते 

2012 मध्ये शाहरुख खानने पूजा ददलानीची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली होती आणि काही वेळातच त्याने त्याच्या व्यावसायिक कामाची संपूर्ण जबाबदारी सोपवली होती. ब्रॅण्डसोबतचे त्याचे करार व्यवस्थापित करण्यापासून ते सुपरस्टारच्या कंपन्यांशी संबंधित सर्व कायदेशीर जबाबदारी दिली. 

पूजा ददलानी गौरीच खास नातं 

शाहरुख खानची मॅनेजर, पूजा ददलानी, त्याची पत्नी गौरी खानच्या अगदी जवळ आहे आणि अनेकदा आम्ही त्यांना पार्टी, कार्यक्रम आणि विशेष प्रसंगी एकत्र पाहिले आहे.  8 ऑक्टोबर 2021 रोजी पूजा तिच्या IG हँडलवर गेली होती आणि गौरीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने एक सुंदर फोटो शेअर केला होता. 

पूजा ददलानीची संपत्ती 

पूजा ददलानीकडे जवळपास 45 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे.