स्वातंत्र्य दिन: 'पलटन' सिनेमातील हे गाणं अंगावर शहारे उभं करतो

गाण्याला प्रेक्षकांची पंसती

Updated: Aug 14, 2018, 02:29 PM IST
स्वातंत्र्य दिन: 'पलटन' सिनेमातील हे गाणं अंगावर शहारे उभं करतो title=

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध सिनेनिर्माता जेपी दत्ता पुन्हा एकदा नव्या सिनेमासह एन्ट्री करत आहेत. जेपी दत्ता मागील अनेक दिवसांपासून पलटन सिनेमाच्या बाबतीत चर्चेत आहेत. पलटनची शूटींग पूर्ण झाली असून सिनेमाचा लूक पोस्टर देखील रिलीज झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांकडून सिनेमाला पसंती मिळत आहे. सिनेमाचं पहिलं गाणं देखील रिलीज झालं आहे. 

या गाण्यामध्ये सिनेमातील सर्व कलाकार दिसत आहेत. देशाच्या जवानांवर हा सिनेमा बनवला गेला आहे. जावेद अख्तर आणि अणू मलिक यांनी हे गाणं कम्पोज केलं आहे. गाणं दिव्या कुमार, इरफान, आदर्श आणि खुदा बख्स यांनी गायलं आहे. या गाण्याला म्यूझिक अनु मलिक यांनी दिलं आहे. 

चीनने 1962 मध्ये पुन्हा भारताला युद्धात पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना धूळ चारली होती. सिक्किम सीमा भागातील नाथूला बॉर्डरवर चीन दावा करत होता. या दरम्यान झालेलं लढाई या सिनेमात दाखवण्यात आली आहे. अर्जुन रामपाल, हर्षवर्धन राणे, गुरमीत चौधरी, कुणाल कपूर, जॅकी श्रॉफ, सिद्धांत कपूर, सोनू सूद आणि लव सिन्हा या अभिनेते या सिनेमात आहेत. दीपिका कक्कड आणि अभिनेत्री सोनल चौहान देखील या सिनेमामध्ये दिसणार आहे. जेपी दत्ता यांनी याआधी बॉर्डर, एलओसी कारगिल, गुलामी या सारखे सिनेमे बनवले आहेत. जेपी दत्ता यांचा पलटन सिनेमा 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.