भारतात फक्त या 4 व्यक्तींकडेच आज Tesla कार

विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कची टेस्ला कार पसंत करतात. 

Updated: Jan 20, 2022, 02:15 PM IST
 भारतात फक्त या 4 व्यक्तींकडेच आज Tesla कार title=

मुंबई : इलॉन मस्कची कंपनी टेस्ला या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कारची भारतात बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारतात टेस्लाची नोंदणी झाल्यानंतर, लॉन्चबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

भारतात टेस्ला कार पसंत करणारे असे काही लोक आहेत, जे या गाडीच्या लॉन्चची प्रतीक्षा करू शकले नाहीत.

या लोकांनी टेस्ला कार खरेदी करून आयात केली. विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कची टेस्ला कार पसंत करतात. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचाही यामध्ये समावेश आहे.

Watch A Tesla Have Its Doors Hacked Open By A Drone

सध्या भारतात फक्त चार लोकांकडे टेस्ला कार आहेत. वास्तविक, प्रत्येकजण देशाबाहेर खरेदी केल्यानंतर करोडो रुपयांचे प्रचंड इम्पोर्ट ट्यूडी भरू शकत नाही.

सध्या फक्त काही लोकांकडे इतका खर्च करण्याची क्षमता आहे. हेच कारण आहे की टेस्ला कार सध्या भारतातील रस्त्यावर क्वचितच पाहायला मिळते. देशात केवळ चार लोकांकडे टेस्ला कार आहे.

या यादीत मुकेश अंबानी यांचे नाव प्रथम येते. महागड्या गाड्यांचे शौकीन मुकेश अंबानी यांच्याकडे 1 नाही तर 2 टेस्ला कार आहेत. मुकेश अंबानी यांनी 2019 मध्ये त्यांची पहिली टेस्ला कार खरेदी केली होती.

त्यांची पहिली टेस्ला कार मॉडेल S 100D आहे. हे मॉडेल पूर्ण चार्ज केल्यावर 495 किमी धावण्यास सक्षम आहे आणि त्याचा टॉप स्पीड 249 किमी प्रतितास आहे. ही कार केवळ 4.3 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

Tesla drops Model X price by another $3,000 - The Verge

यानंतर मुकेश अंबानी यांनी टेस्ला मॉडेल X 100D विकत घेतली आणि पर्सनली ती आयात केली. पांढऱ्या रंगाची ही कार आतापर्यंत क्वचितच रस्त्यांवर दिसली आहे.

ही कार देखील मिड-व्हेरियंटची आहे आणि पूर्ण चार्ज केल्यावर 475 किमीची रेंज देते. ही कार केवळ 2.5 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग पकडते.

या दोन दिग्गज उद्योगपतींशिवाय या यादीतील इतर दोन नावे बॉलिवूडमधील आहेत. बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखकडेही टेस्ला मॉडेल एक्स आहे, जी त्याला त्याची पत्नी जेनेलिया डिसूझाकडून भेट म्हणून मिळाली आहे. असं बोललं जातं.

रितेशकडे असलेल्या या कारची किंमत 55 लाख असल्याचं समजतंय.

त्यानंतर माजी मिस इंडिया पॅसिफिक पूजा बत्रा या यादीत आहे. तिच्याकडे एंट्री-लेव्हल टेस्ला मॉडेल 3 आहे. बेस मॉडेल असूनही ही कार 5 सेकंदात 100 चा स्पीड पकडते. याची रेंज 386 किमी प्रतितास आणि टॉप स्पीड 200 किमी प्रतितास आहे.

एस्सार ग्रुपच्या प्रशांत रुईयाचे नाव या सिरिजमध्ये खूप खास आहे. टेस्ला कार असणारे रुईया हे पहिले भारतीय आहेत.

प्रशांत रुईया यांच्याकडे 2017 पासून टेस्ला कार आहे. रुईया यांच्याकडे निळ्या रंगाचे टेस्ला मॉडेल एक्स आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये दोन मोटर असून त्यात 7 सीट आहेत. ही कार 4.8 सेकंदात 100 kmph चा वेग गाठते