IMDb Indian Web Series : आपल्याला कोणताही चित्रपट किंवा सीरिज पाहायची असेल तर आपण आधी IMDb वर जाऊन त्या चित्रपटाला किंवा सीरिजला किती रेटिंग्स आहेत हे तपासतो. आज भारतातील IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार निर्धारित होणाऱ्या आजपर्यंतच्या टॉप 50 वेब सीरिज कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. या यादीत टॉप 5 मध्ये सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी, द फॅमिली मॅन, अस्पिरंटस या सीरिज आहेत. चला तर जाणून घेऊया टॉप 50 वेब सीरिज कोणत्या आहेत...
IMDb च्या आजवरच्या टॉप 50 सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज
1. सेक्रेड गेम्स
2. मिर्झापूर
3. स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी
4. द फॅमिली मॅन
5. अस्पिरंटस
6. क्रिमिनल जस्टीस
7. ब्रीद
8. कोटा फॅक्टरी
9. पंचायत
10. पाताल लोक
11. स्पेशल ओपीएस
12. असूर: वेलकम टू यूवर डार्क साईड
13. कॉलेज रोमान्स
14. अपहरण
15. फ्लेम्स
16. धिंडोरा
17. फर्जी
18. आश्रम
19. इनसाईड एज
20. अनदेखी
21. आर्या
22. गुल्लक
23. टीव्हीएफ पिचर्स
24. रॉकेट बॉयज
25. देल्ही क्राईम
26. कँपस डायरीज
27. ब्रोकन बट ब्युटीफूल
28. जामतारा: सबका नंबर आएगा
29. ताज़ा खबर
30. अभय
31. हॉस्टेल डेझ
32. रंगबाज़
33. बंदीश बँडीटस
34. मेड इन हेव्हन
35. इममॅच्युअर
36. लिटल थिंग्ज
37. द नाईट मॅनेजर
38. कँडी
39. बिच्छू का खेल
40. दहन: राकन का रहस्य
41. जेएल50
42. राना नायडू
43. रे
44. सनफ्लॉवर
45. एनसीआर डेज
46. महारानी
47. मुंबई डायरीज 26/11
48. चाचा विधायक हैं हमारे
49. ये मेरी फॅमिली
50. अरण्यक
दरम्यान, वरील दिलेल्या यादीत 1 जानेवारी 2018 ते 10 मे 2023 मध्ये भारतात सगळ्यात जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेब सीरिज सांगितल्या आहेत. या सगळ्या वेब सीरिज IMDb युजर्सच्या पेज व्ह्यूजनुसार निर्धारित झालेले रँकिंग आहे. आता या वेब सीरिज कोणत्या प्लॅटफॉर्मवरच्या आहेत, असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. मग या सगळ्या वेब सीरिज प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, डिसने + हॉटस्टार, झी5, वूट, एमएक्स प्लेयर, जिओसिनेमा आणि एएलटीटी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहायळा मिळतील.
हेही वाचा : छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा ‘सिंहासनाधिश्वर’ च्या माध्यमातून लवकर येणार रुपेरी पडद्यावर!
दरम्यान, या सीरिजपैकी सगळ्यात टॉपला असेलेली सीरिज म्हणजे मिर्झापूर याच निमित्तानं त्यांचे निर्माते करण अंशुमान म्हणाले, “IMDb कडून मिळालेली ही मान्यता खरोखरच इंटरनेटवर भारतीय दर्शकांना उपलब्ध असलेल्या कंटेटविषयी माहिती पुरवण्यात मदतगार ठरेल.
स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरीमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेला प्रतिक गांधी म्हणाला, "या सीरिजमध्ये हंसल मेहता यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. स्कॅमच्या आधी आणि स्कॅमच्या नंतर असे माझे आयुष्य पूर्ण बदलले आहे. रिलीज झाल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही IMDb कडून शोला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या जगभरातील चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो देतो. आम्ही यश मिळवण्याचा स्कॅम शोधला होता, असे नक्कीच म्हणता येईल!”
द फॅमिली मॅन आणि फर्जी या सीरिजचे निर्माते असलेले राज निदिमोरू आणि कृष्णा डी. के. म्हणाले, “आमचे दोन्ही शोज- द फॅमिली मॅन आणि फर्जी हे या यादीत आले त्यासाठी आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. आम्ही जे करत आहोत ते योग्य आहे हा आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला अजून चांगल काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.