IMDb Top Movies and Web Series In 2022 : 1 जानेवारी ते 7 नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात थिएटरमध्ये किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी आणि दर महिन्याला IMDb वर असलेल्या 20 कोटी दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे सातत्याने IMDb युजर्समध्ये सातत्याने लोकप्रिय असलेले आणि किमान 25 हजार मतांसह 7 पेक्षा अधिक सरासरी IMDb युजर रेटिंग असलेले चित्रपट. हा IMDb चित्रपट रँकिंगमधून घेतलेला विशेष आणि निश्चित डेटा आहे व हे रँकिंग वर्षामध्ये दर आठवड्याला अपडेट होत असते. IMDb ग्राहक त्यामध्ये भर घालू शकतात व हे आणि इतर टायटल्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात.14 डिसेंबर 2022—IMDb (
www.imdb.com), ह्या जगातल्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीज संदर्भातील सर्वांत प्रसिद्ध व सर्वांत विश्वसनीय माहितीच्या स्रोतानं आज जगभरातील IMDb युजर्समध्ये सर्वांत प्रसिद्ध असलेल्या 10 भारतीय चित्रपट आणि वेब सिरीजची घोषणा केली.
2022 मधील IMDb वरील 10 सर्वाधिक हिट भारतीय चित्रपट
1. RRR (राईज, रोअर, रिवॉल्ट)
2. द कश्मीर फाईल्स
3. K.G.F: चॅपटर 2
4. विक्रम
5. कंतारा
6. रॉकेटरी: द नंबी इफेक्ट
7. मेजर
8. सिता रामम
9. पोनीयिन सेल्वन: पार्ट वन
10. 777 चार्ली
2022 मधील IMDb च्या सर्वाधिक हिट भारतीय वेब सिरीज 2022
1. पंचायत
2. देल्ही क्राईम
3. रॉकेट बॉयज
4. ह्युमन
5. अपहरण
6. गुल्लक
7. एनसीआर डेज
8. अभय
9. कँपस डायरीज
10. कॉलेज रोमान्स
1 जानेवारी ते 7 नोव्हेंबर 2022 मध्ये भारतात थिएटरमध्ये किंवा डिजिटल प्रकारे प्रदर्शित झालेल्या सर्व वेब सिरीजपैकी आणि दर महिन्याला IMDb वर असलेल्या 20 कोटी दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजच्या आधारे सातत्याने IMDb युजर्समध्ये सातत्याने लोकप्रिय असलेल्या आणि किमान 25 हजार मतांसह 7 पेक्षा अधिक सरासरी IMDb युजर रेटिंग असलेल्य सिरीज. हा IMDb चित्रपट रँकिंगमधून घेतलेला विशेष आणि निश्चित डेटा आहे व हे रँकिंग वर्षामध्ये दर आठवड्याला अपडेट होत असते. IMDb ग्राहक त्यामध्ये भर घालू शकतात व हे आणि इतर टायटल्स त्यांच्या IMDb वॉचलिस्टवर जोडू शकतात.
ह्या वर्षातील सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीज आणि चित्रपटांबद्दल आणखी माहिती:
1. 2022 यादीतील सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांचे स्वरूप वैविध्यपूर्ण आहे, त्यामध्ये तमिळ (विक्रम, पोन्नीयिन सेल्वन: पार्ट वन, रॉकेटरी: द नंबी इफेक्ट), तेलुगु (RRR, मेजर, सीता रमन) आणि कन्नडा (K.G.F.: चॅपटर 2, कंतारा, 777 चार्ली) चित्रपट उद्योगांचा समावेश आहे.
2. 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' आणि 'मेजर' हे दोन बायोपिक आहेत जे IMDb च्या 2022 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत.
3. पाच वर्षांच्य ब्रेकनंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि कमाल हसन चित्रपटांमध्ये परतले आणि 2022 मधील सर्वांत प्रसिद्ध चित्रपट 'पोन्नियीन सेल्वन: पार्ट वन' आणि 'विक्रम' ह्यामध्ये त्यांचा समावेश होतो.
4. 2022 च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजमध्ये सहा सबस्क्रिप्शनवर आधारित प्लॅटफॉर्मचा समावेश आहे व प्रत्येकी एक मालिका ही प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्नी+, हॉटस्टार, व्हूट आणि झी5 मधील आहे तर तीन सोनी लिव्हमधील आहेत व स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन प्रकारामध्ये ग्राहकांना असलेल्या व्यापक निवडीची कल्पना ह्यावरून येते.
5. सबस्क्रिप्शनवर आधारित कंटेंटच्या पलीकडे ह्या यादीमधील दोन सिरीज 'एनसीआर डेज' आणि 'कँपस डायरीज' ह्या अनुक्रमे AVOD प्लॅटफॉर्म्स युट्युब आणि एमएक्स प्लेयरवर मोफत बघण्यासाठी उपलब्ध आहेत.
RRR ही 2022 चा सर्वांत प्रसिद्ध IMDb चित्रपट बनण्यासंदर्भात बोलताना चित्रपट निर्माते एस. एस. राजामौलींनी म्हणाले, 'RRR ही एक मैत्रीची कहाणी आहे व प्रत्येकाला ती जवळची वाटते. गोष्ट सांगण्याच्या प्राचीन भारतीय पद्धतीसह ती सांगितले आहे व हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे. ह्या सन्मानासाठी मी IMDb बद्दल आभारी आहे आणि मला हे प्रेम व कौतुक दाखवल्याबद्दल जगभरातील दर्शकांना धन्यवाद द्यायचे आहे. हे यश पूर्ण कलाकारांचे व क्र् मेंमबर्सचे आहे व पडद्यावर प्रेक्षकांना दिसणारी जादु उभी करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते.'
प्राईम व्हिडिओमधील कंटेंट लायसन्सिंग दिग्दर्शक मनिष मेघनानी यांनी म्हटले, 'दुसऱ्या सीजनमध्ये सुद्धा अमेझॉन ओरिजिनल सिरीज पंचायत दर्शकांना खिळवून ठेवत आहे हे बघताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजचे प्रेक्षक ज्या गोष्टींना रिलेट करता येईल अशा भूमिकांचे कौतुक करतात. अतिशय हलक्या फुलक्या विनोदाच्या माध्यमाद्वारे दर्शकांसोबत भावनिक नाते जोडून पंचायत ऑन स्क्रीन सादरीकरण्याच्याही पुढे गेली आहे. 2022 मधील IMDb च्या सर्वांत प्रसिद्ध भारतीय वेब सिरीजमध्ये पहिल्या स्थानी असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. या सिरीजमधील कहाणी आणि पात्रांमध्ये हरखून गेलेल्या आमच्या चाहत्यांना व IMDb युजर्सना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. फुलेराचे रहिवासी पुढे काय करतील, हे बघण्यासाठी आम्ही आता अतिशय उत्सुक आहोत.'