पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट कपड्यात इलियाना डिक्रूझ कॅमेरात कैद

 इलियाना डिक्रूझ नेहमी कोणत्या नं कोणत्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते.

Updated: Mar 15, 2022, 07:54 PM IST
पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट कपड्यात इलियाना डिक्रूझ कॅमेरात कैद title=

मुंबई : इलियाना डिक्रूझ नेहमी कोणत्या नं कोणत्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते. असाच एक फोटो अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून चाहते तिच्यावर भडकले आहेत. या नवीन फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा  ट्रान्सपरंट ड्रेस घातलेला दिसत आहे. विशेष म्हणजे या ट्रान्सपरंट ड्रेसमध्येही अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत आहे.

पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अभिनेत्रीची हवा
या फोटोत इलियानाने पांढऱ्या रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा हा ड्रेस पाहून ड्रेसवर चिकनकारीचं काम केल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीने हा  फोटो शेअर करताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत  आहे.

इलियानाचे हे फोटो पाहताच क्षणी चाहते तिच्यावर कोतुकाचा वर्षाव करत आहेत.  या फोटोत अभिनेत्रीच्या मागे समुद्र दिसत आहे. हे सुंदर फोटो अभिनेत्रीने कॅप्शनसोबत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय की, 'ग्रेट बीच डेज आणि कॉकटेल.'

बऱ्याचदा परिधान करते ट्रान्सपरंट कपडे
याआधीही इलियाना डिक्रूझने ट्रान्सपरंट कपडे परिधान केलेले फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली होती आणि अभिनेत्रीने त्यावर काळ्या रंगाचा लाँग श्रग घातला होता. हा श्रग ट्रान्सपरंट होता ज्यामध्ये अभिनेत्रीची बिकिनी स्पष्ट दिसत होती. फोटोत, इलियाना डिक्रूझ समुद्रावर बांधलेल्या लाकडी घरावर उभी असलेली पोज देताना दिसली.