मुंबई : बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान याच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. 2-3 वर्षात चित्रपट न देऊनही आमिर खानचा प्रत्येक चित्रपट सुपर डुपर हिट ठरतो. आजही लोकं त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत. पण प्रेक्षकांच्या मनात नेहमी प्रश्न पडतो की आमिर खान 3 वर्षात एक चित्रपट करूनही एवढं लक्झरी आयुष्य कसं जगतो? त्याचा हा बिझनेस मंत्र जाणून घेण्याची विनंती चाहते नेहमीच करताना दिसतात. मिस्टर परफेक्शनिस्ट हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे हे सर्वांनाच माहीत आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त, आमिर त्याच्या बिझनेस ब्रँड प्रमोशन, एंडोर्समेंट्सद्वारे देखील भरपूर पैसे कमावतो. जर आमिरच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत 61 चित्रपट केले असून प्रत्येक चित्रपटासाठी तो 50 ते 60 कोटी रुपये घेतो. अशा स्थितीत त्याच्याकडे भक्कम बचत आहे. तसंच अनेक जाहिरातींच्या ऑफर्स त्याच्याकडे येत राहतात आणि जाहिरातींमधून तो भरपूर पैसाही कमावतो.
आमिर खानला सुरुवातीपासूनच लक्झरी जीवन जगण्याची सवय आहे. आमिर खानकडे आलिशान बंगला तसंच 9 मोठी वाहनं आहेत.आमिर खानच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस आणि फोर्ड सारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. पण मिस्टर परफेक्शनिस्टचं वैयक्तिक आयुष्य वाटतं तितकं परिपूर्ण नाही. आजही तुटलेल्या लग्नाचं दुखणं आमिर खानला खूप सतावतं. अभिनेत्याच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर आमिर खान वार्षिक 120 कोटी कमावतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता 1500 कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे.