राधे माँ ची भूमिका साकारण्याची 'या' अभिनेत्रीची इच्छा!

राधे माँ कायम काही ना काही कारणास्तव चर्चेत आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 1, 2017, 05:23 PM IST
राधे माँ ची भूमिका साकारण्याची 'या' अभिनेत्रीची इच्छा!  title=
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : राधे माँ कायम काही ना काही कारणास्तव चर्चेत आहे. आपल्या भक्तांना आपल्या भक्तिभावात रंगवणारी राधे माँ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्याबद्दल अनेक बऱ्या वाईट चर्चा रंगत असल्या तरी एका बॉलिवूड अभिनेत्रीला चक्क चित्रपटात तिची भूमिका साकारायची आहे.

राधे माँ चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओवर एका न्यूयॉर्कमधील युजरने लिहिले की, "स्वतःला अध्यात्मिक गुरु म्हणणं किती विचित्र आहे. मुख्य म्हणजे असे लोक अस्तित्वात आहेत? हे केवळ अशक्य आहे." त्याच्या कमेंटनंतर अभिनेत्री हुमा कुरेशीने कमेंट केली, "मला तिच्या जीवनावर आधारित चित्रपटात भूमिका करायची आहे. ही खरंतर माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाची भूमिका ठरेल."

हुमाची ही कमेंट वाचून एकदा त्यावर आणखी एका युझरने या विचित्र चित्रपटाची स्क्रिप्ट तरी कशी लिहायची, असे विचारले.  त्यावर हुमा म्हणाली, "त्यासाठी विचित्रच स्क्रीप्ट लिहावी लागेल." हुमाने ही इच्छा गंमतीने व्यक्त केली असली तरी यावर चित्रपट बनवण्याचा विचार  बॉलिवूडमध्ये नक्कीच होऊ शकतो.