कंगना आणि हृतिकच्या वादावर वडील राकेश रोशन यांचं स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत राहिला.

Updated: Oct 4, 2017, 06:44 PM IST
कंगना आणि हृतिकच्या वादावर वडील राकेश रोशन यांचं स्पष्टीकरण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत राहिला.

कंगना तिच्या ‘सिमरन’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका टीव्ही शोमध्ये हृतिकवर अनेक आरोप लावले होते. त्यानंतर पुन्हा त्यांच्यातील वादाची चर्चा रंगली. आता या प्रकरणावर हृतिकचे वडील राकेश रोशन यांना वक्तव्य केलंय. 

बॉलिवूडलाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसात्र, राकेश रोशन म्हणाले की, ‘आम्ही केवल हवेत बोलत नाहीत. आम्ही फालतूच्या आरोपांवर विश्वासही ठेवत नाही. आम्ही आमची तक्रार पूर्ण पुराव्यानिशी जमा केली आहे. जर तुम्हाला याची कॉपी हवी असेल तर तुम्ही महेश जेठमलानी यांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता’. 

ते पुढे म्हणाले की, ‘जर तुम्ही तक्रार वाचाल तर हैराण व्हाल. आम्ही आमच्या बाजूचं सत्य ८ एप्रिल २०१७ ला क्राईम ब्रान्चला सांगितलं आहे. आम्ही सगळे पुरावेही जमा केले आहेत. आता हे सरकारी संस्था ठरवेल की, कोण खरं बोलत आहे? आम्ही नेहमीच सत्यावर विश्वास ठेवला आहे. माझ्या वडीलांनी मला इमानदारी शिकवली आणि तिच शिक्षा मी हृतिकला दिली आहे’.