हृतिक आणि सबाच्या अ‍ॅनिव्हर्सरी पोस्टवर Ex-Wife ची कमेंट; नेटकऱ्यांना का आली 'जादू'ची आठवण?

Hrithik Roshan : हृतिक रोशननं शेअर केलेल्या पोस्टवर Ex-Wife सुझान खानच्या कमेंटनं वेधले लक्ष...

दिक्षा पाटील | Updated: Oct 2, 2024, 11:36 AM IST
हृतिक आणि सबाच्या अ‍ॅनिव्हर्सरी पोस्टवर Ex-Wife ची कमेंट; नेटकऱ्यांना का आली 'जादू'ची आठवण? title=
(Photo Credit : Social Media)

Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद त्यांच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते दोघं त्यांच्या रिलेशनशिपची तीसरी अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत. त्यानिमित्तानं त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात सगळ्यांचे लक्ष वेधले आहे ते हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खाननं केलेल्या कमेंटनं.

हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत हृतिकनं कॅप्शन दिलं की 'अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा पार्टनर 1.10.2024'. हृतिकनं तारिख शेअर केल्यानं ते दोघं 1 ऑक्टोबर रोजी रिलेशनशिपमध्ये आल्याचे दिसले. हृतिक आणि सबाच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे सुझान खानच्या कमेंटनं वेधले आहे. सुझाननं कमेंट करत सुपर पिक. अ‍ॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा आणि त्यासोबत तिनं हार्ट इमोटिकॉन शेअर केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्याशिवाय अनेक लोकांनी हृतिकच्या त्या पोस्टवर त्याच्या आणि सबाच्या रिलेशनशिपला 3 वर्ष झाल्यानं शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हृतिकचे इतके वाईट दिवस येतील वाटलं नव्हतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'यापेक्षा चांगला तू आधीचीसोबत दिसत होतास.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भावा तुला एक सल्ला देतोय, तुला हिच्यापेक्षा चांगली भेटली असती.' फोटोत त्या दोघांनी जशी पोज दिली आहे त्यावरून अनेकांना जादू या चित्रपटाची आठवण आली आहे. एकानं त्यावरून कमेंट करत सांगितलं की 'कोई मिल गया' मधल्या 'जादू' ला डेट करतोय. 

2022 मध्ये करण जोहरच्या 50 हृतिक रोशन आणि सभा आजादनं त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांना अधिकृतपणे सांगितले होते. दोघांनी एकत्र हात धरून एन्ट्री केली होती. सबा एक मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट आहे. त्याशिवाय ती एक अभिनेत्री, थिएटर डायरेक्टर आणि गायिका देखील आहे. सबानं म्यूजिकच्या जगात स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. 

हृतिक आणि सुझानचा घटस्फोट

हृतिक आणि सुझाननं 13 डिसेंबर 2012 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांनी केलेल्या घोषणेनं सगळ्यांना धक्का बसला होता. मात्र, त्यांनी घटस्फोट का घेतला याविषयची कोणतीही माहिती दिली नाही.