मुंबई : जेव्हाही बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करतो. तेव्हा त्याचे फोटो लगेच व्हायरल होतात. तो दररोज आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत त्याचे फोटो शेअर करत असतो. अशा स्थितीत बुधवारी सकाळी त्याने आपल्या घरात बसून एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यात त्याची आई पिंकी रोशन सुद्धा दिसत आहे. या फोटोत असं दिसतंय की, प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही त्याला ट्रोल केलं आहे.
ट्रोल होण्यामागचं कारण
बुधवारी हृतिक रोशनने त्याच्या आईसोबत 'ब्रेकफास्ट डेट'चा एक फोटो शेअर केला. या फोटोत, अभिनेत्याच्या मागे भिंतीवर एक ओलसरपणा आहे. यावर काही मजेदार कमेंट्स येत आहेत. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही हे फोटो पाहिले आणि हृतिक रोशनला त्याच्या घराच्या भिंती दुरुस्त करण्याचा सल्ला दिला.
कॅप्शनमध्ये आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं
या फोटोत हृतिकची आई बाल्कनीतून बाहेर पाहताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये हृतिकने लिहिलं आहे की, 'आपल्या आईबरोबर आळशी ब्रेकफास्टदरम्यान .. बुधवारी संडेची फिलींग सगळ्यात भारी असते. आता तुम्ही सुद्धा एकदा तुमच्या आईला मिठी मारा.
राजदने केली कमेंट
हृतिक रोशनच्या मागे भिंतीवरील ओलसरपणामुळे, भिंतीवरील कवच निघालेली फोटोत दिसत आहे. जे पाहून मालव राजदाने कमेंटमध्ये लिहिलं, 'सर, तुमच्या भिंतीला टच-अपची गरज आहे.'