मुलांसोबत Brahmastra सिनेमा पाहणं हृतिकला पडलं महागात, चाहत्याच्या अशा कृत्यामुळे भडकला अभिनेता

हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 10, 2022, 11:50 AM IST
मुलांसोबत  Brahmastra सिनेमा पाहणं हृतिकला पडलं महागात, चाहत्याच्या अशा कृत्यामुळे भडकला अभिनेता title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कधी चाहत्यांचे पाय धरणारा हृतिक चाहत्यावर संतापल्याचे दिसत आहे. 

आणखी वाचा : शनिवारी करा शनिदेवात्या 'या' मंत्रांचा जप, सर्व संकट होतील दूर

हृतिकचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर Sneh Zala नं शेअर केला आहे. हृतिक त्याची दोन्ही मुलं रिहान आणि हृदानसोबत जुहूमध्ये एका चित्रपटगृहात 'ब्रह्मास्त्र' चित्रपट पाहण्यासाठी गेला होता.  हृतिक आपल्या मुलांसोबत चित्रपट पाहून बाहेर पडत होता. हृतिक कारमध्ये बसणार, तेव्हाच एक चाहता एका चाहत्याने हृतिकच्या सुरक्षारक्षकांना ढकलून जबरदस्तीने हृतिकसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहून ह्रतिकला राग अनावर झाला. आणि तो त्या चाहत्यावर भडकला.

आणखी वाचा : उत्तम अभिनयासाठी काही पण... अमिताभ बच्चन यांनी चक्क खऱ्या सापासोबत केला सीन शूट, खुद्द बिग बींकडून मोठा खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Health Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार
सुरुवातीला हृतिकच्या सुरक्षारक्षकांनी त्या चाहत्याला रागाच्या भरात फटकारलं. मग, कारमध्ये बसण्यापूर्वी हृतिकनं संतापून म्हणाला, “काय करत आहेस? तो काय करत आहे?' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी हृतिकच्या समर्थनार्थ कमेंट करत अशा प्रकारे वागणाऱ्या चागच्यांना सुनावले, कोणत्याही कलाकाराच्या खासगी आयुष्याचा आदर करा. त्यांना त्यांच्या मुलांसोबत थोडी प्रायव्हसी द्या. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत हृतिकला ट्रोल केले आहे. या लोकांना जास्त डोक्यावर घेऊ नका...