तुझ्या प्रेमात झालो खुळा... सबासोबत राहण्यासाठी हृतिकने ओलांडल्या सर्व सीमा

घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री!   

Updated: Feb 5, 2022, 12:08 PM IST
तुझ्या प्रेमात झालो खुळा... सबासोबत राहण्यासाठी हृतिकने ओलांडल्या सर्व सीमा title=

मुंबई : सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याला असते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात खास व्यक्ती कोण आहे? इत्यादी गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. पण आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेता हृतिक रोशनच्या खासगी आयुष्याबद्दल. घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हृतिकला त्या खास व्यक्तीसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. 

हृतिकचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत हातात हात घालून फिरताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर हृतिक सबाची  काळजी घेताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे हृतिक आणि सबा सर्वांसमोर हात पकडून फिरत असल्याचं दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी हृतिकला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पण तेव्हा हृतिकने उत्तर दिले नाही. त्यानंतर  सबा आझादशी संपर्क साधला असता तिने प्रश्नाचं उत्तर फार मोचक्या शब्दात देवून फोन कट केला. 

हृतिक आणि सबाची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. हृतिकसोबत अफेअर्सच्या चर्चांपूर्वी सबा अभिनेते नसीरूद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. एवढंच नाही तर दोघे 7 वर्ष एकत्र राहिले असं देखील सांगण्यात येत आहे.