हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसाठी घेतलं आलिशान घर, किंमत एकूण थक्क व्हाल

हृतिक रोशन- सबा आझाद 'या' आलिशान घरात राहणार, घराची किंमत माहितीय का?   

Updated: Nov 19, 2022, 12:07 AM IST
हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसाठी घेतलं आलिशान घर, किंमत एकूण थक्क व्हाल title=
Hrithik Roshan bought a luxurious house for his girlfriend Saba Azad the total price will amaze you nz

मुंबई : बॉलीवूड कपल (Bollywood Couple) हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) अनेकदा एकमेकांसोबत डिनर डेटवर, तर कधी पार्ट्यांमध्ये स्पॉट होतात. मात्र, या  लव्ह बर्ड्सनी अद्यापही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची प्रेयसी सबा आझाद यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. वैवाहिक नात्यातून बाहेर पडल्यानंतर हृतिकनं बऱ्याच वर्षांनी त्याच्या आयुष्यात कोणा खास व्यक्तीला इतकं महत्त्वाचं स्थान दिलं. परिणामी हे नातं सर्वांच्याच नजरेत आलं.  हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असतात. (Hrithik Roshan bought a luxurious house for his girlfriend Saba Azad the total price will amaze you nz) 

लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार 

हृतिक आणि सबा हे गेल्या काही दिवसांपासून लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार करत होते. अखेर दोघांनी एक घरसुद्धा पसंत केलं आहे. मुंबईतील ‘मन्नत’मध्ये (Mannat) हे दोघं एकत्र राहणार आहेत. आता मन्नत म्हटल्यावर अनेकांना शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बंगला आठवत असेल. मात्र हृतिक आणि सबा ज्याठिकाणी राहणार आहेत, त्या इमारतीचं नावसुद्धा मन्नत आहे. इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांचे नूतनीकरण केले जात आहे. आणि हे जोडपे लवकरच एकत्र शिफ्ट होतील असं सूत्रांकडून कळतंय. हृतिक रोशनने या अपार्टमेंटसाठी जवळपास 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळ ही दोन घरं आहेत. आता सबासोबत राहण्यासाठी त्याने 30 कोटी रुपये खर्च केल्याचं कळतंय.

हे ही वाचा - 'मी त्यावेळी तुझ्या आसपास नसेन...' अर्जुन कपूरने त्याच्या लेडी लव्हसाठी शेअर केली पोस्ट 

हृतिक आणि सबा एकत्र 

काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले जिथे त्याने दोघे डिनर डेट्स, व्हेकेशन प्लानिंग एकत्र कसे करतात हे सांगितले. इव्हेंटमध्येही दोघे हातात हात घालून एन्ट्री घेताना दिसतात.करण जोहरच्या (Karan Johar) 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) हृतिक आणि सबा एकत्र दिसले.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सबा आणि सुझान यांच्यातही चांगली मैत्री 

हृतिक आणि सुझान खान (Sussanne Khan) यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचं पहायला मिळतंय. हृतिक सबाला डेट करत असतानाच सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. हृतिक आणि सुझानला हृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे सबा आणि सुझान यांच्यातही चांगली मैत्री झाली आहे.