मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्यूटनमधून रविवारी 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमातून नागरिकांना संबोधित केलं. यादरम्यान मोदी-ट्रम्प यांच्यात खूप चांगली बाँडिंग पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताचं भरपूर कौतुक केलं. तर त्याचवेळी मोदींनी अमेरिकेला भारताचा चांगला मित्र देश म्हणून उल्लेख केला. या कार्यक्रमामुळे सामान्य नागरिकांबरोबरच बॉलिवूडचे कलाकार देखील उत्साही होती. सोशल मीडियावर त्यांनी ट्विट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
Everything about #HowdyModi was SPECTACULAR. Never have I seen such bonding between two countries. Reaction & cheering of the crowd of 50000 Indians in Houston was emotional & historical. And Hon. Prime Minister @narendramodi ji!! You are a real ROCKSTAR. Bravo. Jai Ho!
— Anupam Kher (@AnupamPKher) September 22, 2019
अनुपम खेर यांनी देखील ट्विटकरून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलं की, #HowdyModi मध्ये सगळं काय शानदार होतं. मी कधीच दोन्ही देशांमध्ये असे संबंध नव्हते पाहिले. ह्यूस्टनमध्ये पन्नास हजार भारतीयांच्या प्रतिक्रिया आणि जयजयकारची भावना ही ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही एक रॉकस्टार आहात. (हे पण वाचा : 'दहशतवादाविरोधात निर्णायक लढाईची वेळ')
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे. मोदी-ट्रम्प आणि या दोन देशांमध्ये झालेल्या भागीदाराचा खूप फायदा होणार आहे.
ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे की, #HowdyModi - गो मोदी, गो ट्रम्प... आम्हाला तुमचा अभिमान आहे. भारताचा देखील अभिमान आहे.
Proud moment for India and fellow indians across the globe . What an inspiring and solid address by @narendramodi . @POTUS also in awe as crowd cheers for the indian prime minister.#HowdyModi
— Karan Johar (@karanjohar) September 22, 2019
What an outstanding adress by our honourable Prime minister @narendramodi on a supreme world stage...so proud to watch the world watching the brilliant adress ....
— Karan Johar (@karanjohar) September 22, 2019
करण जोहरने हा भारतासाठी खूप गौरवाचा क्षण असल्याचं सांगितलं आहे. करणने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, भारतात आणि जगभरात राहणाऱ्या भारतीयांकरता हा खूप अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती प्रेरणादायी आणि ठोस असे भाषण केले आहे.
Triumph over Trump!
Our hearts swell with pride and are won, once again! Statesmanship at its best
A big thank you to @narendramodi ji for for making us all extremely proud to be an Indian. We had all only imagined this, you turned it into reality.
Jai Hind #HowdyModi
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) September 22, 2019
तसेच अभिनेता विवेक ओबेरॉयने देखील ट्विटकरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नरेंद्र मोदी आम्हा भारतीयांना एवढा मोठा आनंदाचा क्षण दिल्याबद्दल आभार. आम्ही जी कल्पना केलेली ते तुम्हा सत्यात उतरवलंत.