मुंबई : डेरा प्रमुख राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्यात २० वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर बाबा आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
राम रहीम आणि हनीप्रीतच्या बॉलिवूड कनेक्शनबाबत आता भुविंदर सिंह गोरा नावाच्या व्यक्तीने धक्कादायक खुलासा केलाय.
भुविन्दर सिंह याने दावा केलाय की, हनीप्रीतला अक्षय कुमारची हिरोईन व्हायचं होतं. इतकेच नाही तर याबाबत हनीप्रीत आणि अक्षय कुमार यांच्यात अनेक बैठकाही झाल्याचे त्याने म्हटले आहे. राम रहीम आणि हनीप्रीत त्यांचा पुढील सिनेमा अक्षय कुमार सोबत करणार होते, असेही म्हटले जात आहे.
राम रहीमला सिने विश्वात घेऊन येणा-या हनीप्रीतचे बॉलिवूडमध्ये चांगले कनेक्शन होते. इतकेच नाही तर हनीप्रीतची मैत्रीण बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा राम रहीमच्या डे-यात अनेकदा आल्याचे बोलले जात आहे.
बॉलिवूड कनेक्शनमुळेच हनीप्रीतने मुंबईतील जुहू बीचसमोर एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅटमध्ये राम रहीम हनीप्रीतसोबत राहत होता, असे बोलले जात आहे.