मुंबई : सासू आणि सून आता पैठणीसाठी भिडणार,पण ह्यात मात्र त्यांचा बबड्या अडकणार..
‘होम मिनिस्टर’ ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश भावोजी गेली १६ वर्ष प्रेक्षकांच अविरत मनोरंजन करत आहेत, आणि लॉकडाऊन च्या काळात सुद्धा होम मिनिस्टर घरच्या घरी च्या माध्यमातून आदेश भावोजी तमाम महाराष्ट्रातील वहिनींची ऑनलाईन भेट घेत आहेत. आता आदेश भावोजी 'होम मिनिस्टर घरच्या घरी' च नवीन पर्व ७ सप्टेंबरपासून आपल्या भेटीला घेऊन येत आहेत.
या पर्वाच नाव आहे "होम मिनिस्टर माझा बबड्या" आता तुम्हाला वाटलं असेल हे काय नवीन तर 'अग्गबाई सासूबाई' मधील 'बबड्या' हे पात्र खूपच चर्चेचा विषय झाला आहे. आशुतोष पत्की ने आपल्या अभिनयातून या पात्राला पुरेपूर न्याय दिलाय. प्रत्येक मूल हे आपल्या आईच लाडकं असतं आणि प्रत्येक मुलात एक बबड्या लपलेला असतो, अशीच 'बबडेगिरी' एका मजेशीर पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
या नवीन पर्वात आदेश भावोजी 'वाहिनी त्यांचे मिस्टर आणि सासूबाई' यांचे नातेसंबंध उलगडतील, या मध्ये खरी कसोटी लागेल ती मिस्टरांची. तेव्हा सासू आणि सून आता पैठणीसाठी भिडणार,पण ह्यात मात्र त्यांचा बबड्या अडकणार..
"होम मिनिस्टर माझा बबड्या" ७ सप्टेंबर पासून सोम - शनि संध्याकाळी ६.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.