Jameela Jamil : बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने धुमाकूळ घालते आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूलनेसने तिने जगभरातील चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. सध्या प्रियांका एका वेगळ्याच आणि मजेशीर गोष्टीवर चर्चेत आहे.
ती चर्चेत येण्यामागचं कारण आहे ते म्हणजे हॉलीवूड अभिनेत्री जमीला जमील हिने एका मुलाखतीतून तिचा केलेला उल्लेख. जमीला जमील हिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे परंतु अलीकडेच असा एका प्रकार झाला जेव्हा तिला लोकं चुकून प्रियांका चोप्रा म्हणून ओळखू लागले.
लोकं आपल्याला चुकून प्रियांका चोप्रा म्हणून ओळखतात तेव्हा ही गोष्ट आपल्याला अभिमानाची वाटते अशी प्रतिक्रिया जमीला जमील हिने व्यक्त केली.
एका मुलाखतीदरम्यान तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर देताना जमीलाने प्रियांकाचा उल्लेख केला. तेव्हा ती म्हणाली की, मी प्रियांका चोप्राबद्दलही खूप चुकीचा विचार केला होता परंतु मी तसा विचार करायला नको होता. तिला लोकं माझ्या नावानेही ओळखतात तेव्हा लोकं चुकून जरी तसं बोलत असेल तरी मला ते सन्मानाप्रमाणे वाटते. आयुष्यात वेळ खुप कमी असतो तेव्हा आपण प्रयत्न क्षण हा आनंदाने जगला पाहिजे. जीवन साजरे करणे तितकेच आवश्यक आहे, असं जामीलने सांगितले.
गेल्या वर्षी, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने जमीला आणि प्रियंका या दोघांना ओळखण्यात गल्लत केली होती आणि त्याच्या ट्विटमध्ये त्या युझरने असे लिहिले होते की, "म्हणून निक जोनास आणि जमीला जामिल यांचा घटस्फोट झाला का?" त्यानंतर जमीलाने यावर प्रतिक्रिया देऊन सांगितले की, "माझ्यासारखी दिसणारी एक वेगळी भारतीय स्त्री @priyankachopra आहे आणि मला विश्वास आहे की ते (नीक आणि प्रियंका) अजूनही एकत्र आनंदी आहेत." प्रियांकानेही 'LOL' या कमेंटवर प्रतिक्रिया दिली होती.
त्या युझरने प्रियंका आणि जमीला यांना ओळखण्यात गफलत केली होती त्यावर ट्विट करत जमीलाने गैरसमज दूर केला होता.