लोकप्रिय अभिनेत्यानं आवळला गळा; सेलिब्रिटी पत्नीच्या गंभीर आरोपांमुळं वकिलही हादरले

नात्यात आलेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या कायदेशीर लढाईमुळं ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

Updated: Oct 8, 2022, 11:38 AM IST
लोकप्रिय अभिनेत्यानं आवळला गळा; सेलिब्रिटी पत्नीच्या गंभीर आरोपांमुळं वकिलही हादरले  title=
Hollywood Actress Angelina Jolie blams ex husband Brad Pitt used to beat her

मुंबई : हॉलिवूड (Hollywood) अभिनेता जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्या नात्यात दुरावा आला आणि काही दिवसांपूर्वीच एका खटल्यामुळं या नात्याची वेगळी बाजू सर्वांनी पाहिली. ज्यामागोमाग आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्याची काळी बाजू जगासमोर आली आहे. ही जोडी म्हणजे अभनेता ब्रॅड पीट आणि एंजेलिना जोली. (Angelina Jolie blams ex husband Brad Pitt)

नात्यात आलेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर सुरु असणाऱ्या कायदेशीर लढाईमुळं ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. angelina नं तिच्या ब्रडवर असे काही आरोप लावले आहेत जे पाहता अनेकांनाच धक्काच बसला आहे. आपला अपमान करण्यासोबतच मुलांसोबतही ब्रॅडनं गैरव्यवहार केल्याचं तिचं म्हणणं आहे. पण, angelina नं केलेले हे आरोप पाहता हा अभिनेत्यावर केला जाणारा हल्लाच आहे अशीच प्रतिक्रिया त्याच्या वकिलांनी दिली आहे. 

अधिक वाचा : Amitabh Bachchan यांना रेखाची 'ही' सवय खटकायची; रेखांनी खाल्ला होता बिग बींचा ओरडा

अभिनेत्रीनं काय आरोप केले आहेत? 
2016 मध्ये झालेल्या वादामध्ये ब्रॅडनं 6 पैकी एका मुलाचा गळा आवळला होता, तर दुसऱ्याच्या चेहऱ्याला इजा पोहोचेपर्यंत मारलं होतं, प्रचंड गैरव्यवहार केला होता असा आरोप एंजेलिनानं केला. मुलांची प्रमाणाबाहेर पाठराखण करण्याच्या मुद्द्यावरून ब्रॅड आणि एंजेलिनाचा वाद झाला होता. 

Angelina Jolie's EXPLOSIVE revelation, tells FBI ex-husband Brad Pitt  yelled 'mum's crazy' at kids! | People News | Zee News

प्रकरण गंभीर वळणावर तेव्हा गेलं जेव्हा (अभिनेत्रीच्या आरोपांनुसार) त्यानं तिला ओडत विमानाच्या प्रसाधनगृहाकडे नेत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलांची नजर पडताच त्यांनी तिथं धाव मारली आणि तेव्हाच ब्रॅड मुलांवरही संतापला. त्यांच्यावर हातही उगारला. 

ब्रॅड आणि एंजेलिना आजच्या घडीला एकत्र नाहीत. 2014 मध्ये त्यांनी विवाहबंधनात अडकत सहजीवनाची सुरुवात केली होती. पण, 2019 मध्ये त्या दोघांनाही कायदेशीररित्या Single घोषित करण्यात आलं. पण, या सेलब्रिटी जोडीच्या घटस्फोटाची लढाई अद्यापही पूर्ण झालेली नाही.