Hina Khan Mucositis : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ही गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. सुरुवातीला कीमोथेरपीनंतर तिचे केस गळू लागले आणि मग काही काळानंतर तिच्यावर कीमोथेरेपीचे साइड इफेक्ट्स जाणवू लागले. तेव्हा पासून तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली होती. नुकतंच तिनं तिची हेल्थ अपडेट देत सांगितलं की तिच्या 5 कीमो पूर्ण झाल्या आहेत आणि आता तीन कीमो बाकी आहेत. येणाऱ्या काळात तिच्या आणखी अडचणी वाढणार आहेत त्याचा अंदाज हा हिनानं बांधला आहे. कॅन्सरमध्येच हिनाला म्यूकोसीटिस झाला आहे. ज्याविषयी सांगत हिनानं चाहत्यांकडून मदत मागितली आहे.
36 वर्षांची हिना खान सोशल मीडियावर चाहत्यांना तिची हेल्थ अपडेट दिली आहे. तिनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत याचा खुलासा केला आहे. त्यानंतर तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. काही तिला घरगुती उपाय सांगत होते तर काही ती लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. हिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यात चाहते मदत मागताना दिसत आहेत. याचं कारण कॅन्सरच्या वेळी होणारी कीमोथेरेपीचे साइडइफेक्ट्स म्यूकोसीटिस आहे. ज्यामुळे खाण्यापिण्याच्या समस्या होऊ लागली आहे.
ही पोस्ट शेअर करत हिना खाननं लिहिलं की कीमोथेरेपीचा हा आणखी एक साइडइफेक्ट म्यूकोसिटीस आहे. मी त्यासाठी डॉक्टरांनी दिलेला सल्ला फॉलो करते. पण तुमच्यापैकी कोणी यातून जात असेल किंवा याविषयी माहिती आहे तर उपयोगी असा उपचार सांगा. तिनं पुढे लिहिलं की 'जेव्हा तुम्ही काही काऊ शकत नाही तेव्हा हे आणखी कठीण होतं. पण कोणी जर काही सल्ला दिला तर त्यानं त्यांना खूप मदत मिळेल. तर कॅप्शनमध्ये हिना म्हणाली, कृपया सल्ला द्या आणि प्रार्थना करा.'
हेही वाचा : सासू-सासऱ्यांसोबत कसं होतं जया बच्चन यांचं नातं? वादानंतर अमर सिंह यांनीच केलेला गौप्यस्फोट
हिनाच्या पोस्टनंतर चाहते खूप कमेंट करत आहेत. कोणी तिला त्यांच्या एक्सपीरियंसनं यातून कसं स्वत: ला सावरता येईल याविषयी सांगताना दिसले तर कोणी तिच्यासाठी प्रार्थना करणार असं सांगितलं. एकानं तिला सल्ला देत सांगितलं की नारळाचं पाणी, बीटचा ज्यूस, आयस्क्रिम हे खा. दुसरा नेटकरी म्हणाला, माझ्या आईनं हे अनुभवलंय आणि आम्ही तिला नारळाचं पाणी प्यायला द्यायचो. तू लवकरात लवकर ठीक व्हावं यासाठी प्रार्थना करते.
एनएचएसनुसार, कीमोथेरेपी रेडियोथेरेपीचा हा एक साइडइफेक्ट आहे. त्यात तोंडाला आतून सूज येते त्रास होतो. म्यूकोसाइटिसमध्ये रुग्णाचं तोडं कोरडं पडतं, तोडं येतं, खाण्या-पिण्यात अडचणी येणं अशा अनेक समस्या होतात.
कीमोथेरेपीमध्ये हिना अमेरिकेत गेली आहे. हिना आता तिथे तिच्यावर उपचार करण्यासाठी गेलीये की कोणत्या प्रोजेक्ट्ससाठी हे अजून समोर आलेलं नाही.