'सोनू सूदला कोठे मिळतात कोरोनाची औषधं?' सरकारने चौकशी करावी हाय कोर्टाचे आदेश

बॉलिवूडचा खलनायक असलेला अभिनेता सोनू सूद कोरोना काळात मात्र सर्वांचा हिरो ठरला.

Updated: May 29, 2021, 02:56 PM IST
'सोनू सूदला कोठे मिळतात कोरोनाची औषधं?' सरकारने चौकशी करावी  हाय कोर्टाचे आदेश title=

मुंबई :  बॉलिवूडचा खलनायक असलेला अभिनेता सोनू सूद कोरोना काळात मात्र सर्वांचा हिरो ठरला. गेल्या वर्षभरापासून तो अनेकांच्या मदतीसाठी धावत आहे. सोनूने अनेकांना त्यांच्या गावी पाठवलं, बेड उपलब्ध करून दिले. एवढंच नाही तर अनेकांना औषधांचा पुरवठा देखील केला. पण महामारीच्या परिस्थितीत सोनू सूदला कोरोनाची औषधं कोठे मिळाली? असा प्रश्न आता उपस्थितीत केला जात आहे. यावर सोनू म्हणला की, 'आम्ही तर फक्त माध्यम आहोत.' तर औषध तयार करणाऱ्या कंपन्या सरकार शिवाय कोणालाही औषधं देत नाहीत. ' असं उत्पादक कंपन्यांनी सांगितलं आहे. 

कोरोना औषधांप्रकरणी हाय कोर्टाने सरकारने चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. चौकशीत कोणत्याही प्रकारची चूक होवू नये असं देखील कोर्टाने सांगितलं आहे. आम्ही फक्त केंद्र सरकारला औषधांचा पुरवठा करतो. असं औषध उत्पादक कंपन्यांनी सांगितलं आहे. 

तर यावर सोनू सूद फाउंडेशनने म्हणणं आहे की, 'आम्ही  उत्पादकांकडून औषधं मागितली आणि त्यांनी दिली. आम्ही जुबिलेंट, सिप्रा, होरेटो कंपनीकडे विनंती केली आणि त्यांनी औषधं दिली.' पण  केंद्र सरकारचं म्हणणं आहे की, आम्ही फक्त सरकारी संस्थांना औषधं दिली आहेत. 

त्यामुळे हाय कोर्टाने तपास सुरू ठेवण्यास सरकारला मौखिक आदेश दिले आहेत. ज्या औषधांचं वितरण सुरू आहे, ती औषधं बनावट तर नाही ना? अशी चिंता हाय कोर्टाने व्यक्त केली आहे. काम जनतेच्या हितासाठी असलं तरी नियम मोडणं चूकीचं आहे. असं देखील हाय कोर्टाने सांगितलं आहे.