Rashmika Mandanna च्या या सवयीला कंटाळलेत तिच्या घरचे, पण का?

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने तिच्या गोंडसपणाने सर्वांची मने जिंकली आहेत.

Updated: Feb 17, 2022, 02:44 PM IST
Rashmika Mandanna च्या या सवयीला कंटाळलेत तिच्या घरचे, पण का? title=

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने तिच्या गोंडसपणाने सर्वांची मनं जिंकली आहेत. रश्मिकाच्य गोंडस दिसण्याचे आणि तिची गोड स्माईलचे अनेक चाहते आहेत.  पण तुम्हाला माहीत आहे का की, सुंदर दिसणारी श्रीवल्लीही तिच्या घरामध्ये खूप हट्टी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने स्वतःबद्दल आणि तिच्या घरच्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.  
 

रश्मिकाने कुटुंबाशी संबंधित एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला. सगळ्यांनाच माहीत आहे की, लहानपणापासूनच फिल्मी दुनियेत प्रवेश केलेल्या रश्मिका तिच्या कामाबद्दल इतकी डेडीकेटेडआहे की,   ती  पर्सनल कामात आणि तिच्या प्रोफेशनल कामात, अगदी आई वडिलांनाही येऊ देत नाही.  खुद्द रश्मिकानेच याचा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना रश्मिकाने सांगितलं होतं की, जेव्हा ती कोरोनामध्ये शूट करण्यासाठी घराबाहेर पडायची तेव्हा तिचे कुटुंबीय खूप घाबरायचे. पण रश्मिका तिच्या कामाबद्दल किती जिद्दी आहे हे तिच्या घरच्यांना माहीत असल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला याबद्दल कधीच काहीच सांगितलं नाही.

रश्मिका म्हणाली,  माझ्या घरचे हे सगळं पाहत होते की, मी एक अभिनेत्री आहे, आणि मला शूटिंगसाठी सेटवर माझा मास्क काढावा लागतो. आणि त्यांना माझी काळजी वाटयची पण ते मला कधी काही बोलयचे नाहीत कारण हे माझ्या कामाचा भाग होता. आणि मी  माझ्या कामात कोणाला बोलू देत नाही. माझ्या पालकांनाही माहित आहे की, मी त्यांचं ऐकणार नाही... जर मला शुटिंगला जाऊ नको किंवा  सुरक्षित नाही असं सांगितलं तरी मी कोणाचं ऐकणार नाही.... कारण मला वाटतं की, मी माझं शूट पूर्ण करावं, कारण या प्रोजेक्टवर लोकांची प्रचंड मेहनत आणि करोडो रुपये खर्च झाले आहेत.

पुष्पामधून रातोरात स्टार बनलेली रश्मिका श्रीवल्ली सर्वांच्या मनावर राज्य करत असून, लवकरच साऊथ सिनेसृष्टीतील हा चेहरा बॉलिवूडमध्येही दमदार एन्ट्री करणार आहे. रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू या चित्रपटात दिसणार आहे.