'Bigg Boss' विनर तेजस्वी प्रकाश एका एपिसोडसाठी घेते बक्कळ पैसे

'Bigg Boss'मुळे तेजस्वी प्रकाशच्या करियरला मिळाली दिशा...  

Updated: Feb 17, 2022, 02:34 PM IST
'Bigg Boss' विनर तेजस्वी प्रकाश एका एपिसोडसाठी घेते बक्कळ पैसे title=

मुंबई : 'बिग बॉस 15' विनर तेजस्वी प्रकाश सध्यातुफान चर्चेत आहे. 'बिग बॉस'ची विनर ठरलेल्या तेजस्वीच्या करियरने भरारी घ्यायला सुरुवात केली आहे. तेजस्वी आता टीव्ही क्विन एकता कपूरची 'नागिन 6' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पसरत असलेल्या अफवानंतर 'नागिन 6' मालिका सुरु झाली आहे. मालिकेच्या 2-3 एपिसोड आणि काही प्रोमो व्हिडीओने प्रेक्षाकांचं मन जिंकलं आहे. 

मालिका रोज नव्या रंजक आणि रहस्यांच्या आधारावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मालिकेत तेजस्वीची देखील वर्णी लागली आहे. मालिकेमध्ये तेजस्वी लीड रोलमध्ये आहे. मालिकेत ती प्राथा नावाच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 2 लाख रुपये घेत आहे. 'Bigg Boss'मुळे तेजस्वी प्रकाशच्या करियरला मिळाली दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही.