हेमांगी कवीनं इंटरनेटवर लावली आग! स्विमिंग पूलमधले बिकीनी फोटो केले शेअर; नेटकरी म्हणाले...

Hemangi Kavi Bikini Look: हेमांगी कवी आपल्या हटके लुकसाठी ओळखली जाते. मध्यंतरी तिनं तिचे स्विमिंग पूलमधील काही फोटोज पोस्ट केले होते आता तिनं त्याचा दुसरा भाग पोस्ट केला आहे. यावेळी ती बिकीनी लुकमध्ये दिसते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 1, 2023, 09:27 PM IST
हेमांगी कवीनं इंटरनेटवर लावली आग! स्विमिंग पूलमधले बिकीनी फोटो केले शेअर; नेटकरी म्हणाले... title=
July 1, 2023 | hemangi kavi shares new photos in swimming pool as she enjoys her vacation (Photos: Hemangi Kavi Instagram)

Hemangi Kavi Bikini Look: अभिनेत्री हेमांगी कवी ही आपल्या बिनाधास्त आणि बेधडक स्वभावासाठी कायमच चर्चेत असते. ती आपले बोल्ड आणि ब्युटीफूल फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करते. तिच्या या फोटोंचीही पुष्कळ चर्चा रंगते. अनेकदा तिला तिच्या पोस्टवरून ट्रोलही केलं जातं. मध्यंतरी तिच्या अनेक पोस्टवरून हेमांगी कवी ट्रोल झाली होती आणि त्या पोस्टची बरीच चर्चाही रंगली होती. त्यामुळे हेमांगी कवी हे नावं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेण्डमध्ये आलं होतं. सध्या हेमांगी कवी समर व्हेकेशनचा आनंद लुटते आहे. सोबतच आता पावसाळाही सुरू झाल्यानं सेलिब्रेटी व्हेकेशन मोडवर आहेत. त्याप्रमाणे हेमांगीही आपल्या सुट्टीचा आनंद घेताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वी तिनं आपले काही फोटो सोशळ मीडियावर पोस्ट केले होते. ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत होती. 

तिच्या या फोटोंची बरीच चर्चाही रंगली होती. तिच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टखाली अनेक नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या होत्या. तर काहींनी तिला ट्रोलही केले होते. आता तिनं आपल्या याच काही स्विमिंग पूलमधील नवे फोटो पोस्ट केले आहेत त्यामुळे तिच्या या फोटोंची सगळ्यांनी नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींना पुन्हा तिला ट्रोलही केलं आहे. परंतु यावेळी हेमांगी कवी ही बिनाधास्त मूडमध्ये दिसते आहे. यावेळी तिनं हटके कॅप्शन लिहिलं आहे ज्यात ती म्हणते की, ''ती Pool राणी - Part 2 सगळ्याचा Sequel (Part) येऊ शकतो मग photos चा का नाही? तुला Sequel चांगलाच धडा!!! आपल्या महाराष्ट्रातलं, आपलं कर्जत! तोच तो, आमचा माणूस'' असं कॅप्शन लिहिलं आहे. 

हेही वाचा - 'लग्नानंतर पती अल्पसंख्याक असल्याचं जाणवलं..' मराठी अभिनेत्री रसिका आगाशेचा मोठा खुलासा

अनेकांनी तिच्या या फोटोंवर विविध कमेंट्स केल्या आहेत. एका म्हटलंय की, ''Waterproof makeup छान टिकला ग तुझा''. तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, तरीच म्हंटलं... ''एवढा पाऊस का बरं पडतोय'' तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ''एकदम जौंकी पँकी दिसतंय'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी हेमांगी कवीनं बिकीनी लुक कॅरी केला आहे. सोबतच तिनं लाल रंगाची डार्क लिपस्टिकही लावली आहे. स्विमिंग पूलमध्ये नानाविध पोझेसमध्ये तिनं आपले हे हटके फोटो शेअर केले आहेत. त्यावेळी स्विमिंग पूलमध्ये असतानाही तिची लाल लिपस्टिक कशी काय टिकली यावर अनेकांनी तिला प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली आहे. हेमांगीचा मागच्या वर्षी 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झाला होता.