Mahashivratri 2023 : Amruta Fadnavis यांनी महाशिवरात्रीनिमित्ताने अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा!

Amruta Fadnavis Song :  अमृता फडणवीस यांनी त्यांचं 'शिव तांडव स्तोत्रम' शेअर करत चाहत्यांना महाशिवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा... 

Updated: Feb 18, 2023, 02:27 PM IST
Mahashivratri 2023 : Amruta Fadnavis यांनी महाशिवरात्रीनिमित्ताने अनोख्या पद्धतीने दिल्या शुभेच्छा! title=

Amruta Fadnavis Song : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस   (Devendra Fadnavis)  यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकवेळा त्या वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत आल्या आहेत. परंतु आज त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. अमृता फडणवीस यांना गायनाची आवड आहे हे सर्वांनाच माहिती आहे. याआधीही त्यांना गाणी गाताना ऐकलं आहे. त्यांची काही गाणीही रिलीज झाली आहेत. अनेकदा त्यांच्या काही गाण्यामुळे त्याचं कौतुक होत असत तर कधी त्यांना ट्रोलही केलं जात. आज मात्र अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी महाशिवरात्रीच्या निमीत्ताने  त्याचं 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं शेअर करत त्यांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

वाचा: जया बच्चन किंवा रेखा नव्हे तर अमिताभ यांचे पहिले प्रेम....! 

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या नव्या गाण्याची माहिती दिली होती. त्यानुसार आजही 'शिव तांडव स्रोतम' चा व्हिडीओ शेअर करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या गाण्याचा हा व्हिडीओ आणि लिंक शेअर केली आहे. त्याचबरोबर, " ॐ नम: पार्वती पतये, हर हर महादेव ! सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा..", असं कॅप्शन दिलं आहे.   या गाण्यामध्ये अमृता फडणवीस एका साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हणताना दिसून येत आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. तर शैलेश दानी या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत. 

दरम्यान मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी त्याचं 'शिव तांडव स्रोतम' हे गाणं रिलिज झालं होतं. या गाण्यात अमृता या साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हटले आहे. रवी जाधव दिग्दर्शित या गाण्याला शैलेश दानी यांनी याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. या गाण्याला 13 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली आहे.