Raju Srivastava Health Update : मोठी बातमी! अखेर 15 दिवसांनंतर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनी....

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी... 

Updated: Aug 25, 2022, 12:31 PM IST
Raju Srivastava Health Update : मोठी बातमी! अखेर 15 दिवसांनंतर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनी....  title=
Raju Srivastava Health Update

Raju Srivastava Health Update : संपूर्ण देशातील प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या, त्यांना आयुष्यातील दु:ख दूर लोटण्याची संधी देणाऱ्या आणि सातत्यानं कलाक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्यासंदर्भातील सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. 

मागील काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल असलेले श्रीवास्तव अखेर शुद्धिवर आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार तब्बल 15 दिवसांनंतर राजू श्रीवास्तव यांना पुन्हा शुद्ध आली आहे. कुटुंबीयांसाठी हा एक मोठा दिलासा असून, या विनोदवीरासाठी प्रार्थना करणाऱ्याही अनेकांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

श्रीवास्तव यांची प्रकृती आता काही अंशी सुधारताना दिसत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली. 10 ऑगस्टपासून श्रीवास्तव यांच्या प्रकृतीनं अनेकांनाच मोठा धक्का दिला होता.

छातीत दुखणं सुरु झाल्यानंतर जीममध्ये ते कोसळले आणि त्या क्षणीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांचे प्रयत्न आणि चाहत्यांच्या प्रार्थना अखेर फळल्याचंच यावेळी दिसून येत आहे.