Akshaya Deodhar and Hardik Joshi at Jejuri : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची. मागील वर्षी त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतर त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. अनेकदा ते मंदिरात किंवा देवीच्या दर्शनाला जात असतात. त्यांचे फोटोही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. यावेळी त्यांनी जेजुरीचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे त्यांचे फोटो हे चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. परंतु सर्वांचे लक्ष यावेळी अभिनेत्री अक्षया देवधरकडेच लागले होते. तिनं यावेळी आपल्या आईची साडी परिधान केली होती. तीही 25 वर्षे जूनी होती. तिनं सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. इन्टाग्राम स्टोरीवरून तिनं शेअर केले आहे की, ही तिच्या आईची 25 वर्षांपुर्वीची साडी आहे आणि सोबतच तिनं साडी फ्लॉन्ट करत आपला साडीतला फोटो शेअर केला आहे. राणा दा आणि पाठक बाईंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्यांनी जेजूरीचे दर्शन घेतले असल्याचेही यावेळी त्यांच्या फोटोंमधून दिसते आहे. हार्दिक आणि अक्षयानं काल जेजूरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे. ते यावेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत तिथे गेले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन त्यांनी खंडोबाची पूजा केली त्यानंतर दर्शन घेऊन आल्यावर त्यांनी यावेळी भंडाराही उधळला आहे.
2016 साली आलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनं घराघरात त्यांना लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांना सर्वच प्रेक्षक हे राणा दा आणि पाठक बाई म्हणूनच ओळखू लागले. या मालिकेलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आजही ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या अफेअरची अनेकदा चर्चा रंगली होती परंतु ते दोघं विवाहबंधनात अडकतील याबद्दल कुणालाच काहीच थांगपत्ता नव्हता. परंतु मागच्या वर्षी मात्र त्यांना सर्व चाहत्यांना आश्चर्यचकीत केले. त्यांनी आपला विवाह सोहळा पार पाडला. त्यांच्या विवाहसोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. सोशल मीडियावरही ते दोघं चांगलेच सक्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या फोटोंचीही अनेकदा चर्चा रंगताना दिसते. त्यातून आता ते पुन्हा रूपेरी किंवा छोट्या पडद्यावर कधी पाहायला मिळणार याचीही अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा - ''ब्री ग्रेड चित्रपटांत काम केलंय म्हणून...''; 'गदर-2'च्या अभिनेत्रीवर आक्षेप; अमीषा पटेल आली मदतीला धावून
यावेळी अक्षयाच्या साडीवर येऊया. तिची साडी ही केशरी रंगाची होती आणि हिरवा पदर होता यावेळी ती या साडीत प्रचंड सुंदर दिसत होती.