Shah Rukh Khan : 'द काश्मिर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे नेहमीच कोणताही चित्रपट आला की त्यावर त्यांची प्रतिक्रिया देतात. यावेळी त्यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या जवान चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी वक्तव्य केलं की शाहरुखचा जवान हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर असेल. तर विवेक अग्निहोत्रीच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'जवान'चा प्रीव्ह्यू हा 10 जुलै रोजी प्रदर्शित झाला. 'पठान' प्रमाणे शाहरुख या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. त्यामुळे जवान पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या चित्रपटात शाहरुख डबल रोल साकारताना दिसणार आहे. शाहरुखची एक भूमिका ही IPS ऑफिसरची आहे तर दुसरी भूमिका ही व्हिलनची आहे. याच चित्रपटावरह विवेक अग्निहोत्री प्रतिक्रिया दिली आहे.
We aren’t in Bollywood game and terms like ‘clash’ etc. are for stars and media. I can guarantee S RK’s Jawan will be an all-time blockbuster. But after seeing it please also see our small film about India’s greatest victory in a war you know nothing about. #TheVaccineWar https://t.co/gYE2iUdIos
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 12, 2023
विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत म्हणाले "आम्हाला बॉलिवूडच्या क्लॅश गेममध्ये अडकायचं नाही. हे कलाकार आणि मीडियासाठी आहे. मला यावर विश्वास आहे की 'जवान' ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरणार. पण यानंतर आमचा एक कमी बजेटचा चित्रपट द वॅक्सिन वॉर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नक्कीच पाहा. हा चित्रपट भारताच्या त्या विजयावर आहे ज्याविषयी तुम्हाला माहितही नसेल." विवेक यांच्या या ट्वीटनंतर एका नेटकऱ्यानं "हिंमत असेल तर शाहरुखच्या चित्रपटासोबत हा चित्रपट प्रदर्शित करा" असं म्हटलं आहे. त्यावर उत्तर देत विवेग अग्निहोत्री म्हणाले, "आपला देश हा विविधता असलेला देश आहे. इथे सगळ्या प्रकारचे प्रेक्षक आहेत. त्या सगळ्यांच्या सन्मान केला जातो. प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या मुलांना मारहान करणारे चित्रपट दाखवण्याची इच्छा नसते. काही कुटुंबाना त्यांच्या मुलांना इंस्पायरिंग आणि एज्युकेशनल चित्रपट दाखवायचे असतात."
We are a diverse country. I am sure there is space and audience for all kind of audience. Not every family wants to take their children to maar dhaad films. Some like to show films to children that inspire, educate and enlighten. #TheVaccineWar #ATrueStory https://t.co/9mgyjEG0SI
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 12, 2023
पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले, "आम्हाला आमच्या कंटेंटवर विश्वास आहे. आम्हाला चित्रपट कमी बजेटमध्ये बनवायला आवडतो. त्यामुळे आमच्यावर बॉक्स ऑफिसचं प्रेशर नसतं. द व्हॅक्सिन वॉल हा चित्रपट 10 कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. याचा बजेट हा द काश्मिर फाइल्स पेक्षा कमी आहे. "
हेही वाचा : Shahrukh Khan नं नयनताराचा पतीला दिली वॉर्निंग म्हणाला, "सावधान! जवानच्या सेटवर..."
'जवान' चित्रपटात शाहरुख दाक्षिनात्य अभिनेत्री नयनतारासोबत अॅक्शन आणि रोमान्स करताना दिसणार आहे. तर त्या दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तर हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.