Hardik-Akshaya Marriage: अक्षया-हार्दिक लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर

Hardik Joshi-Akshaya Deodhar : राणादा आणि पाठकबाई लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

Updated: Nov 5, 2022, 10:48 PM IST
Hardik-Akshaya Marriage: अक्षया-हार्दिक लवकरच अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका आली समोर title=

मुंबई : मराठी इंडस्ट्रीतली सर्वात प्रसिद्ध जोडी रणादा आणि पाठकबाई लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. पण आता लग्न जवळ आल्याचं दिसतंय. कारण हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर (Hardik Joshi-Akshaya Deodhar) यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अक्षया आणि हार्दिक जोशी यांचा साखरपुडा पार पडला होता. तेव्हा फोटो पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता. पण आता ही जोडी खऱ्या आयुष्यात ही एकत्र येणार आहे. ( Hardik Joshi-Akshaya Deodhar marriage card viral marathi news )

हार्दिक-अक्षया अडकणार विवाहबंधनात

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या माध्यमातून दोघेही घराघरात पोहोचले आणि ही जोडी हीट ठरली. दोघांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे आता दोघांचं लग्न कधी होणार याची उत्सूकता चाहत्यांमध्ये दिसत आहे. दोघांच्या लग्नाची तारीख अजून समोर आलेली नसली तरी देखील लग्नाची तयारी सुरु झाल्याचं कळतंय. तुळशीविवाहानंतर लग्नसराई सुरु होते. त्यामुळे त्यानंतर आता दोघांचं लग्न होऊ शकतं.

दोघांचा पहिला सिनेमा

अक्षया आणि हार्दिक जोशी यांच्या लग्नाला काही खास मित्र मंडळी, नातेवाईकांना बोलवलं जाणार आहे. दोघांच्या लग्नाची लग्नपत्रिता अभिनेत्री ऋचा आपटेने शेअर केलीये. हार्दिक जोशीने हरहर महादेव सिनेमात काम केल्यानंतर आता तो महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात काम करणार आहे. या सोबतच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा पहिला चित्रपट 'चतुर चोर' याचं शूटिंग देखील पूर्ण झालं आहे.