Happy Birthday-Shruti Hasan जाणून घ्या श्रुतीच्या अनोख्या सवयींविषयी...

1992 मध्ये वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तिने 'तेवर मगन' या तामिळ सिनेमासाठी पार्श्वगायन केले होते.

Updated: Jan 28, 2019, 11:33 AM IST
Happy Birthday-Shruti Hasan   जाणून घ्या श्रुतीच्या अनोख्या सवयींविषयी...  title=

मुंबई: बॉलिवूड, टॉलिवूड सिनेमांमध्ये  अपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री श्रुती हसन हिचा आज वाढदिवस. अभिनयसोबतच गायन क्षेत्रातही ती तितकीच सक्रिय असल्याचं पहायला मिळालं. 1992 मध्ये वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तिने 'तेवर मगन' या तामिळ सिनेमासाठी पार्श्वगायन केले होते. श्रुतीने 2000 मध्ये 'हे राम' या सिनेमाच्या माध्यमातून चंदेरी दुनीयेत पदार्पण केले. श्रुती हसन ही अष्टपैलू अभिनेते आणि राजकीय नेते कमल हसन यांची कन्या आहे.

सिनेमातील विविध भूमिकांसोबतच ती शारीरिक सुदृढतेकडेही तितकच लक्ष देते. त्यामुळे  श्रुती ही तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते. आरोग्याची काळजी घेण्याला तिचे नेहगमीच प्राधान्य असते. ज्यायासाठी ती दररोज योग्य तो आहार घेते त्याचप्रमाणे व्यायमही करते. तिला नृत्याचीही विशेष आवड आहे. याचा खुलासा खुद्द श्रुतीनेच एका मुलाखतीत सांगितले होते. ती दररोज तासभर नृत्य करते. ज्यामुळे शारीरिक सुदृढतेमध्येही ही सवय तिला फायद्याची ठरते. सोबतच मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते. 

कलाविश्वातील कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी तिने तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले होते. व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्वं देणारी श्रुती निहमीत पोहण्यालाही पसंती देते. ठरलेल्या दिनचर्येनुसार आठवड्यातील तीन दिवस ती आवर्जून पोहते. धावणे, योगासने करणे हे श्रृतीचे रोजचे व्यायाम प्रकार आहेत. नियमित व्यायम केल्याने वजण नियंत्रणात राहण्यास मदत होते असे तिचे म्हणणे आहे. 

शरीरात पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी ती नारळ पाण्याचे पिण्याला पसंती देते. त्याचप्रमाणे संतुलीत आहारही घेते. तिच्या आहारात अंडे, इडली, फळे, भाज्या असतात. श्रृतीला गोड पदार्थ फार आवडतात. एकंदर या सर्व सवयी पाहता धकाधकीच्या आयुष्यातही श्रुती खऱ्या अर्थाने स्वत:ला वेळ देते. त्यामुळे हेच तिच्या निरोगी आणि आनंदी आय़ुष्याचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही.