रेखाच्या आयुष्यात आले १० पुरूष, तरीही आज एकटी!

रेखा ही आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आजही तिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल आयुष्याबाबतही जोरदार चर्चा असते. रेखाचं खाजगी आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हतं. रेखाने दोन लग्ने केली.

Updated: Oct 10, 2017, 01:00 PM IST
रेखाच्या आयुष्यात आले १० पुरूष, तरीही आज एकटी! title=

मुंबई : रेखा ही आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आजही तिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल आयुष्याबाबतही जोरदार चर्चा असते. रेखाचं खाजगी आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हतं. रेखाने दोन लग्ने केली.

पण त्यातील एकही टिकलं नाही. रेखाचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं. असे म्हणतात की, तिच्या आयुष्यात तब्बल १० पुरुष आले होते. काहींना तिने सोडलं, काहींनी तिला सोडलं. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती अमिताभ बच्चन यांची…बाकीचे नऊ जण कोण होते हे आता बघुया…. 

रेखाने उद्योगपती मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं होत. असेही म्हटले जाते की, आधी विनोद मेहरासोबत तिने लग्न केलं होतं. ऋषी कपूर आणि नीतूच्या लग्नात तिने विनोद मेहराच्या नावाचं कुंकू लावलं होतं. त्यानंतर रेखाचं नाव नवीन निश्चर, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्याशीही जोडलं गेलं.

साजिद खान -

रेखाचं हे पहिलं प्रेम होतं. प्रसिद्ध निर्माता महबूब खान यांचा मुलगा साजिद खान. हा महबूब स्टुडिओचा मालक होता. तो अमेरिकेहून नुकताच भारतात आला आणि त्याची भेट झाली ते रेखासोबत. रेखाचा साधेपणा त्याला खूप भावला. नंतर साजिदने रेखाला त्याचा मनातील तिच्याविषयीचं प्रेमही सांगितलं. रेखाने त्याचा स्विकारही केला. पण ती कामात खूप व्यस्त असल्याने प्रेमासाठी वेळ देऊ शकली नाही आणि त्यांचं नातं तुटलं. तोपर्यंत रेखाच्या जीवनात नवीन निश्चल आला होता. 

नवीन निश्चल-

नवीन हे रेखाचं पहिले फिल्मी प्रेमी होते. आणि नंतर लगेच ते रेखाचे ख-या आयुष्यातीलही प्रेमी झाले. रेखाचा सिनेमा ‘सावन भादों’ हा होता आणि रेखाचे हिरो होते नवीन निश्चल. नवीन निश्चल स्मार्ट असल्याने रेखा त्यांच्याकडे आकर्षित झाली. मात्र, हे एकतर्फ़ी प्रेम होतं. नवीन निश्चल यांना रेखा पसंत नव्हती. तेव्हा रेखाचा लूकही इतका खास नव्हता.

विश्वजीत -

त्यानंतर रेखाचं नाव विश्वजीत यांच्यासोबत जोडलं गेलं. रेखासोबत त्यांच्या किसींग सीनचे फोटो छापले गेल्यानंतर या जोडीच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. ‘दो शिकारी’ मध्ये विश्वजीत आणि रेखा यांच्यात किसींग सीन होता. दरम्यान डिरेक्टर कट म्हणनं विसरले आणि त्यांचा किस सुरूच राहिला. त्यानंतर चर्चा झाल्या की, विश्वजीत आणि रेखा यांच्यात प्रेम आहे. मात्र, हे प्रेम फार कमी काळ टिकलं.

जितेंद्र-

आता रेखाच्या जीवनात जितेंद्र यांनी एन्ट्री घेतली होती. रेखा स्वत: जितेंद्र यांची मोठी फॅन होती. मुमताजसोबतची त्यांची जोडी तिला पसंतही होती. लहान असताना जितेंद्र यांची शूटींग बघण्यासाठी तिने मारही खाल्ला होता. जितेंद्रवर रेखा फिदा होती. मात्र, जितेंद्र यांचं शोभासोबत लग्न झालं आणि रेखाची इच्छा अपूर्णच राहिली.

शत्रुघ्न सिन्हा

जितेंद्रनंतर रेखा शत्रुघ्न सिन्हाचा आधार मिळाला आणि अनेक ठिकाणी दोघे हातात हात घालून फिरताना बघितले गेले. मात्र हे नातंही जास्त टिकलं नाही. त्याचं कारण आजपर्यंत कुणालाही माहिती पडलं नाही.

विनोद मेहरा-

विनोद मेहरा आणि रेखाच्या रोमान्सची चांगलीच चर्चा झाली. नंतर दोघांनी गुपचुप लग्नही केले होते. मात्र विनोद मेहराच्या आईने रेखाचा स्विकार केला नाही. त्यामुळे रेखा विनोदला सोडून आली होती.

किरण कुमार-

किरण कुमार सोबत रेखाचं नाव काही काळासाठी जोडलं गेलं होतं. विनोद मेहरासोबत झालेल्या वादानंतर रेखा खूप वैतागलेली होती. अशात किरण कुमार यानी तिला आधार दिला आणि दु:खातून सावरण्यासाठी मदत केली. पण या दोघांचंही नातं जास्त काळ टिकलं नाही.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखाचं नाव सर्वात जास्त चर्चेत राहिलं. या दोघांची जोडी सुपरहिट झाली होती. आजही ही जोडी पसंत केली जाते. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. ‘दो अनजाने’ या सिनेमाच्या सेटवर हे दोघे पहिल्यांदा भेटले आणि जवळ आले. अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत प्रेम असल्याचे कधीही कबूल केले नाही, मात्र रेखा या नात्यासाठी पूर्णपणे तयार होती. आजही दोघे सार्वजनिक ठिकाणी ऎकमेकांना टाळतात.

यश कोहली

देव आनंद यांचा पुतण्यात यश कोहलीसोबतही रेखाचं नाव जोडलं गेलं. विनोद मेहरानंतर हे दोघे जवळ आले होते. इतकेच नाहीतर असेही म्हटले जाते की, दोघांनी लग्नही केले होते. या दोघांचं नातं बराच काळ चालू होतं. नंतर दोघेही वेगळे झाले

मुकेश अग्रवाल

रेखाने १९९० मध्ये दिल्लीतील उद्योगपती मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेशने आत्महत्या केली होती. याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मुकेशने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते की, त्याच्या मरणासाठी कुणालाही जबाबदारी धरू नये. त्यानंतर रेखा एकटीच होती. तिचं कुणासोबतही नाव जोडलं गेलं नाही.