HanuMan movie on ott : अभिनेता तेजा सज्जाचा सुपरहिट ठरलेल्या 'हनुमान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. मकर संक्रांतिच्या आधी म्हणजेच 12 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. कमी बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाईड कमाईविषयी बोलायचे झाले तर 293 कोटींची एकूण कमाई केली. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या दोन महिन्यांनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे.
मूळ तेलुगूमध्ये असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तेजा सज्जासोबत या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरतकुमार देखील आहे. आता हाच चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट Jio Cinema हिंदी प्रेशकांना पाहायला मिळणार आहे. 16 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमियर देखील कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.
'हनुमान' च्या बॉक्स ऑफिसविषयी बोलायचं झालं तर त्याच्या हिंदी व्हर्जननं 52 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट प्रशानंत वर्मा यूनिव्हर्सचा पहिला चित्रपट आहे. अंजनाद्रिच्या काल्पनिक गावाची आहे. चित्रपटात हनुमंथु आहे, ज्याला अंजनाद्रिच्या लोकांना वाचवण्यासाठी हनुमानाच्या शक्ती मिळतात. तो एका एका मणिच्या संपर्कात येतो, ज्यानंतर त्याच्या आयुष्यात सगळं काही बदलून जातं. त्यानंतर तो संपूर्ण गावाचा शत्रू असलेल्या मायकलच्या विरोधात उभा राहतो आणि त्याच्या गावाचं रक्षण करतो. खरंतर या चित्रपटाच्या पटकथेशी प्रेक्षक स्वत: ला जोडून घेत आहेत. कारण चित्रपटात तेजाच्या भूमिकेतील अनेक गोष्टी सर्वसामान्य व्यक्तीला त्याच्यात असल्याचे जाणवेल.
हेही वाचा : आज मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले, याच स्पर्धेमुळे अमिताभ बच्चन झालेले कंगाल
दरम्यान, चित्रपटाला मिळालेल्या यशाला पाहता तेजा सज्जानं प्रेक्षकांचे आभार मानले होते. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी खूप आनंदी आहे की सगळीकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना चित्रपट पाहताना आनंद झाला त्यांना चित्रपट आवडला आणि मी चित्रपटाला मिळालेली प्रतिक्रिया पाहून देखील आश्चर्यात आहे. तर काही दिवसांपूर्वीच प्रशांत वर्मा यांनी ‘हनुमान’ च्या सीक्वल‘जय हनुमान’ ची घोषणा केली. त्यांनी या चित्रपटावर काम सुरु केलं आहे.