हृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप

Hansika Motwani Birthday:  'कोई मिल गया' हा चित्रपट आपण हजारवेळा पाहिला असेलच. या चित्रपटानं नुकतीच 20 वर्षे पुर्ण केली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अभिनेत्री हंसिका मोटवानी तुम्हाला माहिती असेलच. तिनं हार्मानल इंजेक्शन खरंच घेतलं होतं का? यावर जोरात चर्चा सूरू झाली होती ज्यावर तिनंच खुलासा केला होता.

गायत्री हसबनीस | Updated: Aug 9, 2023, 11:13 AM IST
हृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप title=
August 9, 2023 | hansika motawani opens about taking harmonal injection for looking a grown up woman

Hansika Motwani Harmonal Injection: 'कोई मिल गया' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. नुकतेच या चित्रपटानं 20 वर्षे पुर्ण केली आहेत. तुम्हाला या चित्रपटात दिसणार लहानशी मुलगी आठवत असेलच. जी हृतिक म्हणजेच रोहितची मैत्रीण होती. आज तिही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. दाक्षिणात्त्य आणि हिंदी चित्रपटांतून तिनं लोकप्रिय भुमिका केल्या आहेत. या अभिनेत्रीचे नावं आहे हंसिका मोटवानी. आज हंसिकाचा वाढदिवस आहे. हंसिका आज लोकप्रिय स्टार आहे. तुम्हाला आठवत असेलच की हंसिका ही 'कोई मिल गया' या चित्रपटात प्रचंड लहान होती त्यामुळे तिच्या क्युटनेसनं तिनं सर्वांनी प्रेमात पाडले होते. त्यानंतर तिनं अभिनयातून ब्रेक घेतला होता. परंतु 2007 साली ती हिमेश रशमियासोबत पुन्हा रूपेरी पडद्यावर दिसली होती. त्यावेळी ती मुख्य भुमिकेत होती आणि हा चित्रपट होता 'आप का सुरूर' हा. हा चित्रपट आल्यानंतर जेव्हा हंसिकाला या चित्रपटातून पाहिले तेव्हा प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

कारण अगदी तीन चार वर्षांपुर्वी लहान असलेली हंसिका इतकी मोठी कशी दिसते? असाच प्रश्न सर्वत्र विचारला जात होता. तेव्हा माध्यमांमध्ये एकच चर्चा होती ती म्हणजे हंसिकानं हार्मानल इंजेक्शन घेऊन आपलं रूप अधिक ग्लॅमरस करायचा प्रयत्न केला आहे. हंसिका जन्म हा 9 ऑगस्ट 1991 साली झाला होता. 'कोई मिल गया' या चित्रपटात ती साधारणत: 12 वर्षांची असावी कारण हा चित्रपट तेव्हाच 2003 साली प्रदर्शित झाला होता. परंतु त्या चित्रपटातही ती थोडी लहान वाटते आहे कारण या चित्रपटाचे शुटिंग हे 1990s च्या शेवटी झालेले होते. तेव्हा हा चित्रपट नंतर प्रदर्शित झाला होता. त्यातून तिचा दुसरा चित्रपट हा 'कोई मिल गया'नंतर प्रदर्शित झाला होता. जो 2007 साली आला होता. त्यामुळे तिची 4 वर्षात एवढी मोठी कशी झाली याचीच सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. 

हेही वाचा - दु:खद बातमी! सलमान खानला Bodygaurd बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे निधन

तिनं हार्मानल इंजेक्शन घेतलं होतं का यावर जोरात चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे तिला प्रचंड टीकाही सहन करावी लागली होती. यावर खुद्द तिनंच खुलासा केला आहे. तिच्या आईनंच तिला हे इंजेक्शन दिलं होतं अशी टीकाही माध्यमांमध्ये सुरू झाली होती. हंसिकाचे नुकतेच लग्न झाले आहे. तेव्हा तिनं आपल्या लग्नाचा एक शो होस्ट केला होता. ज्याचे नावं होते 'लव्ह शादी ड्रामा'. यावेळी या शोमधून तिनं आपल्या या पसरवलेल्या अफवांवर भाष्य केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती म्हणाली होती की, ''अभिनेत्री होणं हे काही सोप्पं नाही. त्यातून मी 21 वर्षांची होते तेव्हा माझ्याबद्दल अनेक अफवा या पसरवल्या गेल्या होत्या. त्यातून मला जर का तेवढा वेळ असता तर मी नक्कीच घेतला असता परंतु माझ्या आईनं मला हार्मानल इंजेक्शन देऊन मोठ्या बाईसारखे केले होते अशी चर्चा सुरू झाली होती.'' यावर हंसिकानं ही अफवा असल्याचे सांगितले होते आणि त्यावर भाष्य केले होते. त्यातून तिच्या आईनंही यावर खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, लोकांना काही अक्कल आहे की नाही? जर मी अशी कोणी असते तर मग मी कोणी मोठी अंबानी किंवा टाटा असते. आम्ही पंजाबी आहोत. त्या वयातील मुलींचे आम्ही योग्य संगोपन करतो.तेव्हाच त्या मोठ्या होतात.''