'इंडस्ट्रीत कोणीही तुमचा मित्र नाही'

'इंडस्ट्रीमध्ये कोणीही त्याची साथ दिली नाही, त्याला मदतीसाठी कोणीही हाथ पुढे केला नाही'

Updated: Jun 15, 2020, 05:03 PM IST
'इंडस्ट्रीत कोणीही तुमचा मित्र नाही' title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या जगातून त्याची अशी अचानक एक्झिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. त्याच्या आत्महत्येचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधून अनेक प्रतिक्रिया येत आहे. यादरम्यान प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भवनानीने (Sapna Bhavnani)सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडवरच गंभीर टीका केली आहे.

सपना भवनानीने सुशांतच्या  'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी'मध्ये आपलं योगदान दिलं होतं. सपना क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीची हेअर स्टायलिस्ट होती. सुशांतच्या निधनाने सपनालाही मोठा धक्का बसला आहे. तिने बॉलिवूडवर प्रश्न उपस्थित करत एक पोस्ट केली आहे. सपनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, 'सुशांत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या कठीण परिस्थितीतून जात होता. इंडस्ट्रीमध्ये कोणीही त्याची साथ दिली नाही, कोणीही त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाही. त्याला मदतीसाठी कोणीही हाथ पुढे केला नाही. आज सुशांतसाठी पोस्ट करताना समजतंय की ही इंडस्ट्री किती उथळ आहे, इथे कोणीही तुमचा मित्र नाही'

....ते मला बॉलिवूडमधून बाहेर फेकतील; सुशांतला होती धास्ती

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s no secret Sushant was going through very tough times for the last few years. No one in the industry stood up for him nor did they lend a helping hand. To post about him today is the biggest display of how shallow the industry really is. No one here is your friend. RIP 

A post shared by (@sapnamotibhavnani) on

'माहिती होतं तर सुशांतला मदत का नाही केली?' गायकाचा मुकेश भट्टना सवाल

 

रविवारी सुशांतने वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येसह तो, त्याच्या सोबतचे सर्वच प्रश्न अनुत्तरीत ठेऊन गेला. सुशांत नैराश्यात असल्याचं बोललं जात असून त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलतं, आपलं जीवन संपवलं. सुशांत यशाच्या शिखरावर असताना त्याची अशी एक्झिट मनाला चांगलीच चटका लावणारी ठरली. 

सुशांतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीतील प्रस्थापितांवर कंगनाचा खळबळजनक आरोप