Kareena Kapoor Khan चा एवढा महागडा मास्क, किंमत ऐकून बसेल धक्का

कोरोनाने फोटो शेअर करत चाहत्यांना मास्क घालण्याचं केलं आवाहन 

Updated: Apr 7, 2021, 08:58 AM IST
Kareena Kapoor Khan चा एवढा महागडा मास्क, किंमत ऐकून बसेल धक्का   title=

मुंबई : सध्या सगळीकडेच कोरोना (Covid-19) मुळे अनेक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांना आता कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor), विक्की कौशल (Vickky Kaushal), कटरीना कैफ (Katrina Kaif), आलिया भट्ट (Alia Bhatt), गोविंदा (Govinda), परेश रावल (Paresh Rawal), भूमि पेडनेकर (Bhoomi Pednekar)आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सह बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt(@aliaabhatt)

अशा परिस्थितीत करीना कपूरने आपल्या चाहत्यांना कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना हा कोणता प्रोपोगेंडा नाही तर मास्क वापरा आणि स्वतःचा बचाव करा असं म्हटलं आहे. मात्र करीनाच्या या आवाहनापेक्षा तिच्या मास्कच्या किंमतीची जोरदार चर्चा रंगली आहे. (Kareena Kapoor च्या दुसऱ्या मुलाचा फोटो लीक, रणधीर कपूर यांनी चुकून केला फोटो पोस्ट)

 

करीनाच्या या व्हिडिओत तिचा मास्क सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. करीनाच्या मास्कची किंमत जाणून तुम्हाला सगळ्यांना मोठा धक्का बसेल. करीनाने शेअर केलेल्या फोटोत तिचा मास्क दिसत आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा मास्क घातला आहे. या मास्कवर LV या ब्रँडचं नाव आहे. या मास्कसोबत सिल्क पाऊच देखील मिळतं. या ब्रांडच्या वेबसाइटवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्याची किंमत वाचून थक्क व्हाल. या मास्कची किंमत $355 डॉलर आहे. म्हणजे भारतीय किंमतीत या मास्कची किंमत तब्बल 25 हजार 994 रुपये इतकी आहे.