'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या कलाराने घातला 30 लाखांचा गंडा, कर्जाच्या परतफेडेसाठी करू लागला चेन स्नॅचिंग

क्रिकेट सट्टेबाजीच्या वाईट व्यसनामुळे हा कलाकार लाखो रुपयांच्या कर्जात बुडाला आणि मग कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगारीच्या दुनियेत उतरला.

Updated: Apr 6, 2021, 09:24 PM IST
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या कलाराने घातला 30 लाखांचा गंडा, कर्जाच्या परतफेडेसाठी करू लागला चेन स्नॅचिंग title=

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)' कलाकाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला पकडले आहे. मिराज असे या कलाकाराचे नाव आहे. खरंतर क्रिकेट सट्टेबाजीच्या वाईट व्यसनामुळे हा कलाकार लाखो रुपयांच्या कर्जात बुडाला आणि मग कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगारीच्या दुनियेत उतरला.

रिकाम्या रस्त्यावर मित्राबरोबर करायचा स्नॅचींग

नेटवर्क 18 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मिरज त्याच्या सट्टेबाजीच्या सवयीमुळे गुन्हेगार बनला. क्रिकेट सट्टेबाजीत 25 ते 30 लाख रुपये गमावल्यानंतर त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी चेन स्नॅचिंग सुरू केले. तो रिकाम्या रस्त्यावर आपल्या मित्राबरोबर उभा राहून चेन स्नॅचिंग करायचा.

कसा लागला पोलिसांच्या हाती

रांदेर भेसन चौकाजवळील परिसराला मिरज वल्लभदास कापडी आणि त्यांच्यासह वैभव बाबू जाधव यांना अटक केली आहे. त्यांना पकडण्याचा प्लॅन रांदेर पोलिसांनी एका खबरीच्या माहितीवरुन तयार केला होता, जो यशस्वी झाली. अटकेनंतर या दोघांकडून 3 सोन्याच्या चैनी, 2 मोबाईल व चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपी वैभव आणि मिरज हे जुनागडचे रहिवासी आहेत.

असे करायचे गुन्हा

पोलिसांच्या माहितीनुसार, रिकाम्या रस्त्यावर ते दोघे ही, महिलांना निशाना साधत त्यांच्या चैनी खेचून पळ काढत असत. अटकेनंतर या दोघांनीही त्यांच्यावरील आरोप स्वीकारले आहेत. मिराजने पोट भरण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चश्मा', 'संयुक्त', 'थापकी मेरे अंगणे में' यासह अनेक फेमस हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. इतर अनेक मालिकांमध्येही त्याने साईड रोल केले आहेत. पण मालिकांच्या कमाईमुळे त्याचे भागत नव्हते म्हणून तो सट्टा बाझी करत असल्याचे मिराजने मान्य केले आहे.