मुंबई : पदार्पणपासूनच प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकलेल्या गोविंदाने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या कारकीर्दीमधील असे 10 सिनेमे आहेत जे लोक कधीच विसरु शकत नाहीत. गोविंदाने अभिनेत्री नीलमबरोबर फिल्मी करिअरची सुरुवात केली. या दोघांनीही अनेक चित्रपट एकत्र केले. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षात 5 चित्रपट पडद्यावर दिसले आणि गोविंदा स्टार झाला.
डेब्यू सिनेमानंतर बनला स्टार
२१ डिसेंबर1 963 रोजी महाराष्ट्राच्या विरार येथे जन्मलेल्या गोविंदाचे पूर्ण नाव गोविंद अरुण अहुजा होतं, मात्र चित्रपटांत दिसल्यानंतर त्याला गोविंदा म्हणून ओळखलं जावू लागलं. गोविंदाचे वडील अरुण आहूजा एक अभिनेता होते, तर आई संगीतकार होती. इल्जाम या पहिल्या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदाच्या करिअरला सुरूवात झाली. 1986 मध्ये प्रदर्शित हा सिनेमा जबरदस्त हिट ठरला आणि तिथूनच गोविंदा सुपरस्टार या प्रवासाला सुरुवात झाली.
नीलम सोबत अफेअरची चर्चा
निजाम या सिनेमात अभिनेत्री नीलम त्याच्या अपोझिट होती. त्यांच्या व्यतिरिक्त या सिनेमात शत्रुघन सिन्हा आणि शशी कपूर यांच्याही मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाच्या यशानंतर गोविंदा आणि नीलम यांनी एकत्र पाच सिनेमांत काम केलं. या दोघांनी 'लव 86', 'सिंदूर', 'खुदगर्ज', 'हत्या, फर्ज की जंग', 'तकदीर और दो कैदी' या सिनेमात या दोघांनी एकत्र काम केलं आणि याच दरम्यान या दोघांमध्ये अफेअरची चर्चा रंगू लागली. एका रिपोर्टनुसार गोविंदा नीलमसोबत लग्न करण्याच्या असल्याची बातमी समोर आली
गोविंदा चे लग्न
गोविंदा आणि नीलम यांच्या जवळिकतेची बातमी ऐकून गोविंदाची आईने त्यांनी दुरच्या नातेवाईकांची आणि चित्रपट दिग्दर्शक अनिल सिंह यांची पत्नीची बहीण सुनीताचं स्थळ गोविंदासाठी घेऊन आल्या आणि तिच्या सोबत लग्न करण्याची त्याला विनंती केली. आणि यामुळे गोविंदा त्याच्या आईची ही विनंती टाळू शकला नाही. करिअर सुरू होऊन दोन वर्षात 1987 मध्ये गोविंदांना सुनिता बरोबर लग्नगाठ बांधली