मुंबई : व्रजेश हिरजीचे नाव ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येते. तो एक मजेदार व्यक्तिमत्व आहे ज्याच्या कामाचे वर्णन काही शब्दात करता येणार नाही. आपल्या विनोदाच्या टायमिंगने त्यानं अनेक चित्रपटांमध्ये जान आणली आहे.
यापैकी एक 2008 मध्ये रिलीज झालेला चित्रपट गोलमाल रिटर्न्स होता, ज्यात त्याची अँथनीची भूमिका चांगलीच आवडली होती.
मात्र, आता कित्येक वर्षांनंतर त्याची बदललेली स्टाईल चांगलीच व्हायरल होत आहे. अभिनेता व्रजेश बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही.
अशातच जेव्हा त्याचा लेटेस्ट लूक व्हायरल झाला तेव्हा चाहत्यांना त्याला ओळखणं कठीण झालं. व्रजेश हिरजीच्या सूट बूटमधील काही फोटो समोर आले आहेत, जे पाहिल्यानंतर चाहते त्याला ओळखू शकले नाहीत.
पहिल्या फोटोत व्रजेश सूट घालून अगदी जेंटलमेन लूकमध्ये दिसत आहे, तर इतर फोटोमध्ये पाहून तुम्हाला जुना व्रजेश आठवेल.