बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा गोलमाल अगेन हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करतोय.

Updated: Nov 10, 2017, 04:28 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा गोलमाल अगेन हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करतोय.

रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केलीये. भारतात आतापर्यंत या सिनेमाने १९७.९६ कोटी रुपये कमावलेत. तरुण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीये.

अजय देवगणच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी हा सर्वात हिट सिनेमा आहे. तसेच या वर्षातील हा दुसरा हिट सिनेमा ठरलाय. या सिनेमात अजय देवगण, परिणीता चोप्रा, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि तब्बू यांच्या भूमिका आहे. 

 

रोहित शेट्टीने या सिनेमाला मिळालेले यश पाहता सिनेमाच्या टीमने दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतलाय. मीडिया रिपोर्टनुसार गोलमालच्या पुढच्या पार्टचे नाव गोलमाल २०-२० असेल. २०२०मध्ये हा सिनेमा होईल असे म्हटले जातेय.