प्रभूदेवाच्या गाण्यावर या मुलीने केला जबरदस्त डान्स...

या मुलीचा हा जबरदस्त डान्स तुम्ही पाहिला का?

Updated: Apr 26, 2018, 05:12 PM IST
प्रभूदेवाच्या गाण्यावर या मुलीने केला जबरदस्त डान्स... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता, डान्सर, कोरिओग्राफर प्रभूदेवाच्या 'हमसे है मुकाबला' या सिनेमातील 'प्रेमिकाने प्यार से' हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले. या गाण्यात प्रभूदेवाचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. पण या गाण्याची क्रेझ तरुणाईत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. या गाण्याच्या डान्स स्टेप्सही अनेकजण फॉलो करत आहेत. आता या गाण्यावरील एका मुलीचा डान्स व्हिडिओ समोर आाला आहे.

यांच्यासाठी सोशल मीडिया वरदान ठरत आहे

सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. अनेकजण याच माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट राहतात. त्याचबरोबर तुमचे टॅलेंट, कला सादर करण्याचे हे एक उत्तम व्यासपीठ आहे. ज्यांना आपली कला सादर करण्याची योग्य संधी मिळत नाही त्यांच्यासाठी हे व्यासपीठ एका वरदानासारखे आहे.

 डान्स व्हिडिओ जबरदस्त व्हायरल

आता सोशल मीडियावर एका मुलीचा डान्स व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ Venkat Reddy नावाच्या युट्यूब चॅनलवरुन अपलोड करण्यात आला आहे. पहा तिचा हा जबरदस्त डान्स...

 

इतके व्हूज

या व्हिडिओत या मुलीचे नाव श्रेया रेड्डी दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ याच महिन्याच्या १० तारखेला अपलोड केला होता. हा व्हिडिओ इतका लोकप्रिय ठरला आहे की आतापर्यंत याला 110,196 व्हूज आणि अनेक प्रतिक्रीया मिळाल्या आहेत.