'पोलिसांकडून माझी अशी अवस्था' असं का म्हणतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री

या अभिनेत्रीला काही दिवसांपूर्वी अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Updated: Aug 28, 2021, 08:35 PM IST
 'पोलिसांकडून माझी अशी अवस्था' असं का म्हणतेय  ही प्रसिद्ध अभिनेत्री title=

मुंबई : 'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये बोल्ड अवतार दाखवणाऱ्या गेहना वसिष्ठला काही दिवसांपूर्वी अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. गहना काहि दिवसांपूर्वी तुरुंगातून परतली आहे आणि जेव्हा पासून ती तुरुंगातून परत आली आहे तेव्हा पासून ती पोलिसांवर निशाणा साधत आहे. पुन्हा एकदा गेहानाने मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत.

गेहेनाने पोलिसांवर साधला निशाणा 
फेब्रुवारीमध्ये, मुंबई पोलिसांनी 'अश्लील चित्रपट' बनवण्यासाठी आणि अॅप्सवर प्रसारित केल्याबद्दल गहाना वसिष्ठला अटक केली होती. चार महिने कोठडीत घालवल्यानंतर गेहाना सध्या बाहेर आली आहे.  राज कुंद्राच्या अटकेनंतरही गहनाने त्याला पाठिंबा दिला. अश्लिल व्हिडिओ टाकूनही गेहनाने लोकांना पोर्न आणि एरॉटिक  व्हिडिओंमधील फरक लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. गेहना वशिष्ठ या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांवर निशाणा साधताना दिसत आहे.

फाटलेल्या कपड्यांमध्ये फोटो शेअर
पुन्हा एकदा गेहेनाने मुंबई पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गेहेनाने इन्स्टाग्रामवर स्वतःचे फाटलेले कपडे घातलेले फोटो शेअर केले आहेत. ती तिच्या घरी जाऊ शकत नाही, कारण तिला भीती वाटते की पोलीस तिला अटक करतील. तुम्ही फोटो बघू शकता, गेहाने पिवळ्या रंगाचा कुरता परिधान केला आहे, जो तिच्या काखेतच्या भागात फाटलेला आहे. हा फोटो शेअर करताना गेहेनाने लिहिलं आहे की, 'पोलिसांनी ही दुर्दशा केली आहे, माझं अकांउन्ट ताब्यात घेतलं आहे, पैसे नाहीत, मी घरी जाऊ शकत नाही, आणि मी घरी गेले तरपोलीस मला अटक करतील. सर्व मोबाईल, लॅपटॉप घेतले, गेल्या वेळी जामिनासाठी कार गहाण ठेवली होती

गेहनाने पुढे सांगितलं की, अज्ञात लोकांनी तिच्या घरावर कब्जा केला आहे. ती काही अज्ञात लोकांसोबत राहत आहे. तिने कोणाकडून कर्ज मागून वकिलाची फीही भरली होती. तिच्या पोस्टमध्ये गेहाना वसिष्ठने मुंबई पोलिसांना टॅग करत विचारलं आहे की, ती यापेक्षा जास्त कोणाचं नुकसान कराल का?