बिग बॉस ११ : हितेन तेजवानीच्या पत्नीनं हिनाला घरात येऊन फटकारलं

बिग बॉसचा शुक्रवारचा भाग खूपच भावूक ठरणार आहे... या भागात बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे काही कुटुंबीय त्यांची घरात येऊन भेट घेणार आहेत. 

Updated: Dec 8, 2017, 05:53 PM IST
बिग बॉस ११ : हितेन तेजवानीच्या पत्नीनं हिनाला घरात येऊन फटकारलं title=

मुंबई : बिग बॉसचा शुक्रवारचा भाग खूपच भावूक ठरणार आहे... या भागात बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे काही कुटुंबीय त्यांची घरात येऊन भेट घेणार आहेत. 

यावेळी घरात लव त्यागीचे पिता, आकाश डडलानीची आई आणि हिनाचा बॉयफ्रेंड घरात दाखल होऊन त्यांची भेट घेणार आहेत. हितेज तेजवानीची पत्नी अभिनेत्री गौरी प्रधानही घरात दाखल होणार आहे. 

गौरीचा घरातील वावर चांगलाच प्रेक्षणीय ठरणार आहे, असं दिसतंय. गौरी घरातील इतर सदस्यांशी प्रेमानं बोलताना दिसतेय... मात्र हितेनला हिनानं सुनावलेले बोल गौरीला चांगलेच बोचलेले दिसत आहेत. 

घरातील गौरीच्या एन्ट्रीनं सगळेच घरवाले आनंदी होतात पण तेव्हाच बिग बॉस सगळ्यांना स्तब्ध होण्याचे आदेश देतात. घरात येऊन गौरी पुनिशचं कौतुक करतेय तर शिल्पाला इतक्या मोठ्या मुलांची सर्वात तरुण आई म्हणते. त्यानंतर गौरी सरळ पती हितेनजवळ पोहचली... त्याला पाहताच तीही भावनाविवश होताना दिसतेय. 

त्यानंतर गौरी हिनाला खडे बोल सुनावताना दिसतेय. 'मी जो संदेश पाठवला होता तो माझ्या पतीसाठी होता... तुझ्यासाठी नव्हता' अशा शब्दांत गौरीनं हिनाला फटकारलंय. 

दोन दिवसांपूर्वी कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये हिनानं हितेनला खूप काही सुनावलं होतं... 'विकासच्या पाठीमागे चालणारा' म्हणत तिनं हितेशची हेटाळणी केली होती... तुझ्या पत्नीनं तुला योग्य मॅसेज पाठवला होता, फॉलोअर नाही लीडर बन असंही तिनं त्याला यावेळी सुनावलं होतं... हिनाच्या याच वक्तव्यावर गौरी नाराज आहे. 

गौरीनं विकासला मास्टर माईंड म्हटलंय.... 'मास्टर माईंड, मास्टर स्ट्रोकनं आपल्या मित्रालाच उडवून देऊ नकोस' असं तिनं म्हटलं.