रागाच्या भरात गश्मिरनं सोडली मालिका? नेमकं का उचललं हे पाऊल 

गश्मीर महाजनीने ईमली शो सोडल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना मिळताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

Updated: Jan 26, 2022, 05:07 PM IST
रागाच्या भरात गश्मिरनं सोडली मालिका? नेमकं का उचललं हे पाऊल  title=

मुंबई : गश्मीर महाजनीने ईमली शो सोडल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना मिळताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याने शो का सोडला यावरून मीडियामध्ये अनेक प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. वेब शोसाठी सुट्टी दिली जात नसल्यामुळे रागाच्या भरात त्याने शो सोडल्याचीही चर्चा होती. शोमध्ये त्याची जागा कोण घेणार यावरही अनेकांची नावे चर्चेत आहेत.

ईमलीमध्ये गश्मीर आदित्यची भूमिका करत होता. या शोमध्ये गश्मीर मुख्य भूमिकेत होता. त्याच्या प्रोजेक्ट्समुळे तो शोसाठी जास्त वेळ देऊ शकत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला होता. आता गश्मीरने एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

ईमली शोचा लीड गश्मीर महाजनी आणि सुंबूल तौकीर खान  प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.  शो सोडण्यापासून ते नवीन अभिनेत्याच्या एंट्रीपर्यंत अनेक प्रकारच्या बातम्या चर्चेत आहेत. एका मुलाखतीमध्ये बोलताना गश्मीरने सांगितलं की, शो सोडल्यानंतर तो सगळंकाही मिस करत आहे. शोच्या शूटचा पहिला दिवस. सुंबूल आणि मयुरी हिंदी पट्ट्यात कोणालाच ओळखत नसल्याचंही त्याने सांगितलं. ईमलीने आपल्याला ओळख दिली आहे. गश्मीर म्हणाला की त्याला ईमलीची उणीव भासत आहे. पण नवीन प्रोजेक्टबद्दलही तो उत्सुक आहे.

अशा बातम्या आहेत की, गश्मीरला त्याचे वेब शो आणि मराठी चित्रपट करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. म्हणून त्याने शो सोडला.  यावर गश्मीरने सांगितलं की, फक्त निर्माता गुल खान आणि त्याला माहित आहे की, त्याने ईमली मालिका का सोडली. आणि ते त्यांच्यामध्येच राहील. त्याने रागाने नाही तर मजबूरी म्हणून हा  शो सोडल्याचं त्याने सांगितलं. 

भविष्यात तो गुलसोबतही काम करणार आहे. तारखेचा मुद्दा कधीच नव्हता, असंही गश्मीरने सांगितलं. हा निर्णय त्याने चांगल्या मनाने घेतलेला नाही तर मजबूरी म्हणून घेतला.शोमध्ये त्याची जागा कोण घेईल यावर त्याने उत्तर दिलं की तो खूप आत्मकेंद्रित व्यक्ती आहे.  त्यांच्या जागी कोण येणार याने त्याला काही फरक पडत नाही.