मुंबई : मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अजय देवगन यांच्या आगामी, 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मुंबईतील कमाठीपूरा भागातील महिलांचं आयुष्य, एकेकाळी सत्ता गाजवणारं अंडरवर्ल्ड या साऱ्या परिस्थितीवर चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
अशातच आता चित्रपटातील काही पात्रांविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.
लहानपणापासून अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणारी गंगा, मुंबईत आली. इथे तिला पतीकडूनच धोका मिळाला आणि पुढे देहव्यापाराच्या दुनियेत गंगाची गंगू झाली.
गंगूवर अन्याय होतात आणि अखेर ती आपल्याला न्याय मिळावा यासाठी करीम लालाकडे गेली. कारण त्याच्याकडीलच एका माणसाने गंगूवर अत्याचार केला होता.
मुंबईतील अंडर्वल्डमध्ये चर्चेत असणाऱ्या करीम लालाक़डे गंगू गेली आणि तिथूनच तिनं त्याला भाऊ मानलं.
कोण होता करीम लाला?
करीम लाला हा तोच होता ज्याला खुद्द हाजी मस्तानसुद्धा खूप आदर देत होता. असं म्हटलं जातं की, करीम लालाच्या नावाला तेव्हा मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये वजन प्राप्त होतं.
तो जिथं पाऊल ठेवत होता, तिथे त्याचा प्रभाव होता. लोकांचा थरकाप उडत होता. बऱ्या बेकायदेशीर कामांमध्ये करीम लालाचं नाव पुढे होतं.
इतकंच काय, तर असं म्हणतात की त्यानं दाऊदला भर बाजारात फटकवलं होतं. एकिकडे करीम लालाची भीती सर्वांच्या मनात होती.
तर दुसरीकडे बऱ्याचजणांसाठी मसिहा होता. गरीबांसाठी अन्नदाता होता. गरीब, गरजवंतांचं दु:ख त्याला सहन व्हायचं नाही. ज्यामुळं तो कायम त्यांची मदत करत होता.
पण, आपल्याशी शत्रुत्वं पत्करणाऱ्यांचं जगणं करीम लाला बेजार कर होता. आता मुद्दा असा की अजय देवगन त्याच्या भूमिकेला नेमका कशा पद्धतीनं साकारतो.