Ganapath Trailer : 2070 मध्ये नेऊन हॉलिवूडची आठवण करून देणार 'गणपत'

Ganapath Trailer : टायगर श्रॉफच्या या चित्रपटाच्या ट्रेलरनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... 2070 मध्ये नेत करून दिली हॉलिवूडची आठवण!

दिक्षा पाटील | Updated: Oct 9, 2023, 06:14 PM IST
Ganapath Trailer : 2070 मध्ये नेऊन हॉलिवूडची आठवण करून देणार 'गणपत' title=
(Photo Credit : Social Media)

Ganapath Trailer : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या 'गणपत' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा अॅक्शननं भरपूर असलेला ट्रेलर प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. चला तर टाकूया चित्रपटाच्या ट्रेलरवर एक नजर.

'गणपत' चा हा ट्रेलर 2 मिनट 28 सेकंदाचा आहे. 'गणपत' या चित्रपटाच्या सुरुवातीला व्हॉईसओव्हर आहे. यात असं म्हटलं जातं आहे की 'एक दिन ऐसा योद्धा पैदा होगा जो अमर होगा। वो अमीरों और गरीबों के बीच की दीवार गिराएगा। वो योद्धा मरेगा नहीं, बल्कि मारेगा।' त्यानंतर टायगर अॅक्शन करताना दिसत आहे. टायगरला अॅक्शन करताना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रेक्षकांसाठी ही एक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर क्रिती सेननं ही अॅक्शनसोबत धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहे. त्यात ती बोलताना दिसते की 'में आखिरी वॉर्निंग हैं। जान दे भी सकती हैं और ले भी सकती हैं।'

हेही वाचा : VIDEO : गरीब मुलानं अचानक धरला जिनिलिया देशमुखचा हात, अभिनेत्रीने पुढे जे केलं…

ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की क्रिती सेनन ही टायगर श्रॉफचा जीव वाचवताना दिसत आहे. तर त्यासोबत ती त्याला एका सेफ हाऊसवर घेऊन जाते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी टायगर तिला प्रपोज करतो आणि त्यावर क्रिती बोलते की एकच तर दिवस झाला आहे. तर टायगर म्हणाला की प्रेम होण्यासाठी किती वेळ लागतो. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढते. तर तेव्हाच होते आपल्या सगळ्यांचे लाडके बिग बींची एन्ट्री. ते म्हणतात की आपल्या खेळाची कल्पना श्रीमंत लोकांना लागली आहे. त्यांच्यासाठी त्यांचा पैसाच सगळं काही आहे. तर क्रिती आणि टायगरला काही लोक विभक्त करताना दिसतात. त्या आधी टायगर हा गुड्डू असतो. पण सेकेंड हाफमध्ये टायगर हा गणपतच्या भूमिकेत दिसणार आहे. तेव्हा तो बोलतो की गुड्डूचं चॅप्टर संपलं आणि गणपतचं चॅप्टर सुरु झालं. तर क्रिती सेनन देखील पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसते. चित्रपटातील VFX नं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

पाहा ट्रेलर -

या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही वाशु भगनानी, जॅकी श्रॉफ, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर दसऱ्याच्या निमित्तानं चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.