मुंबई : अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांना भलताच अॅटीट्यू़ड असतो. सेल्फी म्हणा अथवा एखाद्या फॅन्सशी बोलण्यासाठी हे कलाकार मोठा अॅटीट्यूड दाखवत असल्याचे अनेकदा व्हिडिओ आणि फोटोंमधून दिसून आले आहे. मात्र या घटनेतील अभिनेत्री त्याही पलिकडे गेलेली आहे. ही अभिनेत्री निव्वळ सेल्फी काढण्यासाठी आणि भेटण्यासाठीही पैसे आकारते. ही अभिनेत्री कोण आहे ते जाणून घेऊयात.
गेम ऑफ थ्रोन्स फेम एमिलिया क्लार्क (Emilia clarke) हीने नुकतीच रस्त्यावर विनामूल्य सेल्फी घेऊ देणार नसल्याची घोषणा केली आहे. मोफत सेल्फी नाही तर नाही पण तरीही एमिलियाशी संवाद साधू इच्छिणाऱ्या चाहत्यांना यासाठी सुमारे 38 हजार रुपये (£400) द्यावे लागतील. त्याचवेळी, ज्यांना ड्रीम इट फेस्ट फॅन कन्व्हेन्शनमध्ये तिच्यासोबत फोटो काढायचे आहेत त्यांना यासाठी सुमारे 14 हजार रुपये (£150) द्यावे लागतील.
मीडिया रिपोर्टनुसार, एमिलिया क्लार्कने (Emilia clarke) गेल्या 2 वर्षात जवळपास 72 कोटी रुपये कमावले आहेत. एमिलियाने 2021 मध्ये 37 कोटी रुपये आणि 2020 मध्ये सुमारे 34 कोटी रुपये कमावले.'मीट अँड ग्रीट' ट्रेंडमध्ये सामील होणारी एमिलिया क्लार्क ही नवीनतम स्टार आहे.
'हे' स्टार्सही कमवतात
गेल्या महिन्यात डेली मेलने उघड केले की जेंटलमन जॅक स्टार्स सुरण जोन्स आणि सोफी रंडल बर्मिंगहॅम फॅन कॉन्फरन्स दरम्यान त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सुमारे 9,000 रुपये (£90) आकारले होते. यापूर्वी, एका अहवालात असे सांगण्यात आले होते की 2017 च्या अधिवेशनादरम्यान, शेरलॉक स्टार बेनेडिक्ट कंबरबॅचने चाहत्यांसह 3000 फोटो क्लिक करून सुमारे 23 दशलक्ष रुपये (£240,000) कमावले होते.
एमिलिया क्लार्कने (Emilia clarke) तिच्या परफॉर्मिंग आर्ट कंपनी सीनिक रूटद्वारे गेम ऑफ थ्रोन्समधील डेनेरीस टारगारेनच्या यशस्वी भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेतला आहे. अभिनेत्रीचा हा अॅटीट्यू़ड तेथील प्रेक्षकांना आवडला आहे की माहित नाही, पण भारतात नक्कीच ही अभिनेत्री ट्रोल झाली असती.