Gadar 2 Vs OMG 2 and Jailer Box Offfice Collection : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2', अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हे तीनही चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहेत. विकेंड पाहता तीन दिवसात चित्रपटानं जवळपास 350 कोटींची कमाई केली. तर सोमवारी या चित्रपटांनी एकत्र मिळून 80 कोटींची कमाई केली. चला तर जाणून घेऊया या तीनही चित्रपटांनी एकत्र किती कमाई केली.
सनी देओलच्या 'गदर 2' नं सोमवारी बॉक्स ऑफिसवर गदर केला आहे. चित्रपटानं काल बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. Sacnilk नं दिलेल्या वृत्तानुसार, अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक चित्रपट करत आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 39 कोटींची कमाई केली. त्यासोबत या चित्रपटानं आता 170 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटानं एकूण 173.88 कोटींची कमाई केली आहे. 'गदर 2' नं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 40.1 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी हा आकडा वाढून 43.08 कोटींचा झाला. तर तिसऱ्या दिवशी हा आकडा वाढत 51.7 कोटींचा झाला होता. मात्र, सोमवारी हा आकडा कमी झाला आहे. तर त्यांनी 39 कोटींची कमाई केली.
रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. एकीकडे 'गदर 2' नं सोमवारी 39 कोटींची कमाई केली. तर रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटानं 28 कोटींची कमाई केली आहे. एकूण कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर जेलरनं पाच दिवसात 178.60 कोटींची कमाई केली आहे. तर सनी देओलच्या 'गदर 2' नं 173.88 कोटी कमाई ही चार दिवसात केली आहे.
हेही वाचा : Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर'; तिसऱ्या दिवशीच्या कमाईनं मोडले रेकॉर्ड
अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यानं काल म्हणजेच सोमवारी Sacnilk रिपोर्टनुसार, 11.50 कोटींची कमाई केली. तर पहिल्या दिवशी चित्रपटानं सोमवारच्या तुलनेत कमी कमाई केली होती. पहिल्या दिवशी 'ओएमजी 2' नं 10.26 कोटींची कमाई केली होती. ही कमाई पाहता बॉक्स ऑफिसवर अक्षयनं एकूण 50 कोटींचा आकडा पार केला आहे. दोन मोठे चित्रपट असतानाही अक्षयच्या 'ओएमजी 2' नं इतकी कमाई केल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे.