Adnan Sami : अश्लील व्हिडीओ, बनावट पदवी, 17 वर्षात 4 वेळा निकाह; वादग्रस्त आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो अदनान सामी

Adnan Sami Birthday Special : आज जरी अदनान सामी खूप फिट असला तरी एकेकाळी त्याचं वजन 230 किलो होतं. डॉक्टरने त्याला 6 महिने जीवंत राहशील असंदेखील सांगितलं होतं. 

नेहा चौधरी | Updated: Aug 15, 2023, 10:23 AM IST
Adnan Sami : अश्लील व्हिडीओ, बनावट पदवी, 17 वर्षात 4 वेळा निकाह; वादग्रस्त आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो अदनान सामी title=
bollywood adnan sami birthdya specila know about singer weigth loss journey fourth marriage obscene video fake degree

Adnan Sami Birthday Special : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गाय आणि संगीतकार अदनान सामी याचा आज 15 ऑगस्टला वाढदिवस आहे. अदनानचा जन्म  मुत्सद्दी अर्शद सामी खान आणि नौरीन यांच्या पोटी पाकिस्तानमध्ये झाला. अदनान जितका त्याच्या गाण्यामुळे चर्चेत राहिला तितकाच तो त्याच्या वजन आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (bollywood adnan sami birthdya specila know about singer weigth loss journey fourth marriage obscene video fake degree)

तेरा चेहरा आणि लिफ्ट करा दे या गाणीने तो घरोघरी पोहोचला. पण त्याचे पाकिस्तानशी असलेले संबंध आणि 17 वर्षात 4 लग्न, त्यातून पत्नीचे मारहाणपासून अनेक धक्कादायक आरोप यामुळे तो कायम चर्चेत असतो. तो अनेक कठीण प्रसंगांतून गेला पण कधीही खचला नाही.  2016 मध्ये अदनान सामीने एका ट्विटने पाकिस्तानात खळबळ उडवून दिली होती. या ट्विटमध्ये सिंगरने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकच्या भारताच्या निर्णयाचं त्याने कौतुक केलं होतं. ज्यासाठी त्यांचं देशभरात कौतुक झालं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Grace Entertainment & Events (@graceentertainmentuk)

17 वर्षात 4 वेळा निकाह!

अदनानचं पहिलं लग्न 1993 मध्ये हे ऋषी कपूरची अभिनेत्री हिना म्हणजे अभिनेत्री झेबा बख्तियारशी केलं होतं. त्यांना अजान सामी नावाचा एक मुलगा आहे. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्याचा आयुष्यात बिझनेसवुमन अरब सबा गलदारी आली. त्यांचा अफेयरची चर्चा सुरु असताना त्यांनी निकाह केला. पण हेही लग्न 2 वर्षातच तुटलं. आता अदनान एकटा पडला होता. अशा परिस्थितीत त्याची पहिली पत्नी झेबा 2008 मुंबईत आली. या दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता ते दोघे एकत्र राहत होती पण पुन्हा त्यांना जाणवलं हे नातं पुढे जाऊ शकतं नाही. त्या दोघांनी पुन्हा घटस्फोट घेतला. 

अदनानने चौथ लग्न 2010 मध्ये रोया सामी खानशी केलं. त्यांना एक मुलगी आहे. पण अदनानची लग्नाचा प्रवासही खूप कठीण होता. त्याचा दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप केले. मारहाणीपासून लैंगिक छळापर्यंत...पण यावेळी त्याची पहिली पत्नी झेबा त्याचा पाठिशी उभी होती. तिने अदनान असं करु शकतं नाही, असं सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ADNAN SAMI (@adnansamiworld)

हेसुद्धा वाचा - Mohnish Bahl : सलमान खानशी पंगा घेणारा मोहनीश बहल का नाही पाहायचा आईचे चित्रपट?

धक्कादायक आरोप

 त्यानंतर त्याचा आयुष्यात अजून एक भूंकप झाला. एका रिपोर्टनुसार अदनान सामीचा धाकटा भाऊ जुनैदने त्याचा गंभीर आरोप केले. त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अदनानच्या नागरिकत्वापासून त्याच्या पदवीपर्यंत त्याने प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. तो म्हणाला की, अदनान आपल्या जन्माबाबत खोटं बोललंय की त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे. तर अदनान इंग्लंडमध्ये शिक्षणात फेल झाला होता. त्यानंतर त्याने लाहोरमधून बनावट पदवी घेतली. नंतर अदनान अबुधाबीला गेला आणि तेथे त्याने पुढील शिक्षण घेतलं असं त्याने सोशल मीडियावरुन जगाला सांगितलं. त्यानंतर अदनानच्या आयुष्यात अडचणी वाढल्या. एवढंच नाही तर त्याने दुसऱ्या पत्नीचे अश्लील व्हिडीओही काढले हे सांगितल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ADNAN SAMI (@adnansamiworld)

हेसुद्धा वाचा - Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress

फक्त 6 महिने जिंवत राहील!

अदनानच्या गोड आवाजाने सगळ्यांना भूरळ घातली होती. पण त्याचं वजन त्याला मरण्याचा दार घेऊन गेलं होतं. 230 किलो वजनाच्या अदनान सामीला डॉक्टरांनी तू फक्त 6 महिने जिंवत राहू शकतो असं सांगितलं होतं. अशा परिस्थितीतही तो हरला नाही त्यांने जिद्दीने वजन कमी करुन आज तो फिट झाला आहे. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले होत.