कितीही गाजा-वाजा केला तरी 'जवान' पेक्षा 'गदर 2' ची कमाई जास्त, पाहा गणित!

Gadar 2 vs Jawan Profit : 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर 'जवान' पेक्षा कसं मिळवला सगळ्यात जास्त प्रॉफिट... अखेर गणित आलं समोर...

दिक्षा पाटील | Updated: Oct 6, 2023, 06:09 PM IST
कितीही गाजा-वाजा केला तरी 'जवान' पेक्षा 'गदर 2' ची कमाई जास्त, पाहा गणित! title=
(Photo Credit : Social Media)

Gadar 2 vs Jawan Profit : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' आणि शाहरुख खानचा 'जवान' या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. पण तुम्हाला माहितीये का की 'गदर 2' नं शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटापेक्षा जास्त कमाई केली आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. 'जवान' नं चांगली कमाई केली असली तरी सुद्धा चित्रपटाच्या प्रॉफिट मार्जिनचा विचार केला तर 'गदर 2' नं सगळ्यात जास्त कमाई केली. या विषयी कसे कळेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर हे चित्रपटाचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून कळूब शकतं.  

'जवान'च्या पुढे कसा गेला 'गदर 2'?

'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 525 कोटींची कमाई झाली आहे. तर 'जवान'नं भारतीय बॉक्स ऑफिसवर 613 कोटींची कमाई केली. पण त्या दोघांच्या बजेटच्या तुलनेत ही कमाई किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर 'गदर 2' हा चित्रपट 60 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. तर 'जवान' चं बजेट हे 300 कोटी होतं. 'जवान' आणि 'गदर 2' या दोन्ही चित्रपटांच्या बजेटविषयी बोलायचे झाले तर यापैकी कोणत्या चित्रपटाला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली. 'गदर 2' नं 'जवान' च्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर सातपट जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' नं बजेटपेक्षा खूप जास्त कमाई करत हे सिद्ध केलं आहे. तर जवाननं 300 कोटीचं बजेट असताना फक्त 600 कोटींची कमाई केली आणि ही फक्त दुप्पट आहे. पण वर्ल्ड बॉक्स ऑफिसविषयी बोलायचे झाले तर 1100 कोटींची कमाई चित्रपटानं केली आहे.

हेही वाचा : बॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना ऐश्वर्याचे सडेतोड उत्तर म्हणाली, 'तुम्ही कोण...'

या दोन्ही चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर 'गदर 2' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शितझालेल्या 'गदर' या चित्रपटावर आधारीत होता. या चित्रपटात अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांनी सनी देओलसोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर जवान विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात शाहरुख खानसोबत खूप मोठी स्टार कास्ट होती. नयनतारा आणि विजय सेतुपती हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर दीपिकानं या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीनं केलं होतं. तर निर्मिती ही गौरी खाननं केली होती.